अवैध शस्त्रांंविरुद्ध धडक कारवाई
By Admin | Updated: January 15, 2017 00:12 IST2017-01-15T00:12:21+5:302017-01-15T00:12:21+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदा शस्त्र विक्रेत्यांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. शामली जिल्ह्यातून १ कोटी रुपयांची ४५३ पिस्तुले आढळली

अवैध शस्त्रांंविरुद्ध धडक कारवाई
लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदा शस्त्र विक्रेत्यांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. शामली जिल्ह्यातून १ कोटी रुपयांची ४५३ पिस्तुले आढळली जप्त केली आहेत.
शामली व मुझफ्फर नगर हे उत्तर प्रदेशातील संवेदनशील जिल्हे म्हणून आहेत. तिथे अनेक दंगली झाल्या आहेत आणि कायम धार्मिक तणाव असतो. या पार्श्वभूमीवर या दोन ठिकाणी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. शामली जिल्ह्यातील अवैध शस्त्रसाठाप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोतिराम, सरवर, फुरकान, खुर्शीद, अलीम व गय्यूम अशी आरोपींची नावे आहेत. मोतिरामला अटक करण्यात आली, तर उर्वरित सहाही आरोपी फरार आहेत, असे पोलीस अधीक्षक अजयपाल शर्मा यांनी सांगितले. आरोपींना कठोर रासुका लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी अन्य एका घटनेत गुरुवारी काकरा गावातील बेकायदा शस्त्रनिर्मिती कारखाना उघडकीस आणून नऊ पिस्तुले जप्त केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली, तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला, असे पोलीस अधिकारी एस.सी. राठोर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
यंत्रणा झाल्या सतर्क
निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शस्त्रनिर्मिती व विक्रीच्या रॅकेटमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पोलीस दक्षता घेत आहेत. बेकायदा शस्त्र विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस तसेच अन्य यंत्रणा सतर्क सारू्या आहेत.