पुण्याच्या आघाडीच्या फळीने जबाबदारी स्वीकारावी

By Admin | Updated: May 12, 2017 00:57 IST2017-05-12T00:57:30+5:302017-05-12T00:57:30+5:30

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाबाबत एक बाब मात्र निश्चित आहे. हा संघ प्रतिस्पर्ध्यांसाठी जेवढा धोकादायक आहे, तेवढाच स्वत:च्या खेळाडूंसाठीही

Accept responsibility for the Pune plight | पुण्याच्या आघाडीच्या फळीने जबाबदारी स्वीकारावी

पुण्याच्या आघाडीच्या फळीने जबाबदारी स्वीकारावी

रवी शास्त्री लिहितात...
दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाबाबत एक बाब मात्र निश्चित आहे. हा संघ प्रतिस्पर्ध्यांसाठी जेवढा धोकादायक आहे, तेवढाच स्वत:च्या खेळाडूंसाठीही आहे. म्हणजेच दिल्ली संघ प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध एकतर्फी विजय मिळवतो किंवा स्वत: चुका करीत हाताशी असलेला विजय घालवतो. डेअरडेव्हिल्स संघाच्या या कामगिरीमुळे आज, शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत पुणे संघाचे पारडे वरचढ आहे. पुणे संघासाठी ही लढत महत्त्वाची आहे. पुणे संघ बाद फेरीमध्ये स्थान मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे. संघाचे लक्ष्य अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवण्याचे आहे. दिल्ली संघ जेवढ्या वेगाने धावा फटकावतो तेवढ्याच वेगाने धावा बहालही करतो. बळी घेण्यास अपयशी ठरल्यास त्यांची कामगिरी निराशाजनक दिसते. पण त्यांचा दिवस असेल तर दिल्लीची फलंदाजीची बाजू अधिक मजबूत भासते. या लढतीत जर असे घडले तर पुणे संघाकडे दिल्लीला रोखण्याचे फार अधिक पर्याय उरणार नाहीत.
शिस्तीचा विचार करता पुणे संघ आघाडीवर आहे. त्याचमुळे त्यांनी या स्पर्धेत मोठा पल्ला गाठला आहे. दिल्लीबाबत विचार करता उलट स्थिती आहे. सुमार कामगिरीमुळे दिल्ली संघाने चाहत्यांना निराश केले आहे. संघात जर काही उत्साह शिल्लक असेल तर तो आपल्याला लवकरच अनुभवाला मिळेल.
दिल्लीच्या युवा खेळाडूंकडे डाव सावरण्याचे कसब नसल्याचे दिसून येते. त्यांचे मेंटॉर असलेल्या राहुल द्रविडची ही खासियत होती, हे विशेष. हे युवा खेळाडू कुठल्याही चेंडूवर षटकार ठोकतात तर पुढच्याच चेंडूवर धावबाद होतात. त्यांच्याबाबत काही सांगता येत नाही. पुणे संघाला
आघाडीच्या फळीकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. धोनीला सूर गवसणे यापेक्षा
चांगली बाब काय असू शकते. स्टीव्ह स्मिथलाही अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. (टीसीएम)

Web Title: Accept responsibility for the Pune plight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.