अभिषेकने मारला ‘सुवर्ण’तीर
By Admin | Updated: August 15, 2015 23:51 IST2015-08-15T23:51:12+5:302015-08-15T23:51:12+5:30
अभिषेक वर्मा याने भारतीयांना स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट देताना आर्चेरी (तिरंदाजी) वर्ल्डकप स्पर्धेच्या पुरुषांच्या कम्पाऊंड प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे एकदिवसआधी

अभिषेकने मारला ‘सुवर्ण’तीर
वॉकलॉ : अभिषेक वर्मा याने भारतीयांना स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट देताना आर्चेरी (तिरंदाजी) वर्ल्डकप स्पर्धेच्या पुरुषांच्या कम्पाऊंड प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे एकदिवसआधी सांघिक कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत अपयशी ठरलेल्या अभिषेकने वैयक्तिक प्रकारामध्ये सगळी कसर भरुन काढताना भारतासाठी सुवर्ण जिंकले.
जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या अभिषेकने अंतिम सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करताना इराणच्या इस्माईल इबादीला १४८-१४५ झुंजाररीत्या नमवले. या विजयासह अभिषेकने गतवर्षी आशियाई स्पर्धेत झालेल्या इस्माईलविरुध्द झालेल्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा देखील काढला. पुर्णपणे वर्चस्व राखलेल्या या सामन्यात अभिषेक एकूण १३वेळा अचूक १० गुणांचा वेध घेतला. यामुळे इस्माईलवरील दबाव आणखी वाढत गेले. या सामन्यात धमाकेदार सुरुवात करताना इस्माईलने पहिल्या गेममध्ये नोंदवलेल्या २८ गुणांना जोरदार उत्तर देताना ३० गुणांचा वेध घेतला. येथूनच घेतलेली आघाडी त्याने शेवटपर्यंत टिकवून ठेवली. यानंतर त्याने दोनवेळा १० गुणांचा वेध घेताना एकदा नऊ गुण घेत तीन गुणांनी आघाडी घेतली.
तसेच इस्माईलने देखील यावेळी कडवी झुंज देताना अभिषेकला गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र अचूक तिरंदाजीचा धडाका लावलेल्या अभिषेकपुढे त्याचा अखेरपर्यंत निभाव लागला नाही. इंचिओन आशियाई स्पर्धेच्या कम्पाऊंड प्रकाराच्या अंतिम सामन्यात अभिषेकला इस्माईलविरुध्द १४१-१४५ असा पराभव पत्करावा लागला होता. (वृत्तसंस्था)