अभिषेक, अनीष, मथाना चमकले
By Admin | Updated: October 3, 2016 06:07 IST2016-10-03T06:07:27+5:302016-10-03T06:07:27+5:30
पाचव्या फेरीत रविवारी होंडा सीबीआर २५० सीसी ओपन रेसमध्ये अभिषेक व्ही.ने पहिले, अनीष डी. शेट्टीने दुसरे आणि मथाना कुमार एस. यांनी तिसरे स्थान मिळवले

अभिषेक, अनीष, मथाना चमकले
ग्रेटर नोएडा : देशातील एकमेव फॉर्म्युला वन बुद्ध इंटरनॅशनल सर्किट (ग्रेटर नोएडा)मध्ये एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशिप (एआरआरसी) आणि एशिया ड्रीम कप (एडीसी)च्या पाचव्या फेरीत रविवारी होंडा सीबीआर २५० सीसी ओपन रेसमध्ये अभिषेक व्ही.ने पहिले, अनीष डी. शेट्टीने दुसरे आणि मथाना कुमार एस. यांनी तिसरे स्थान मिळवले.
या रेसमध्ये देशातील अव्वल २० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. अभिषेकने १२ मि. ५२.३२६ सेकंदांसह पहिले स्थान मिळवले. अनीषने अभिषेकला कडवे आव्हान दिले; परंतु कमी अंतराने तो दुसऱ्या स्थानी राहिला. अनीषने १२ मि. ५२.३६६ सेकंद वेळ नोंदवला. मथाना कुमार हा १२ मि. ५२.५१७ सेकंदांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
एशिया ड्रीम कपमध्ये भारताचा हरिकृष्णनने ११ वे स्थान मिळवले, तर वाइल्ड कार्ड मिळवणारा आणि या रेसमध्ये प्रथमच सहभागी जाणाऱ्या मथाना कुमारला १५ वे स्थान मिळाले. आॅस्ट्रेलियाच्या ब्रॉक पियर्सनने १७
मि. 0१.६२५ सेकंदांसह विजय मिळवला. थायलंडच्या सित्तीपान श्रीमूनट्रीने १७ मि. 0२.१३८ सेकंदांसह दुसरे आणि मलेशियाच्या हाफीज नौराजमॅनने १७ मि. 0२.५४0 वेळ नोंदवीत तिसरे स्थान मिळवले.
एआरआरसीच्या सुपर स्पोर्ट्स ६00 सी.सी. कॅटेगिरीत आॅस्ट्रेलियाच्या अॅन्थोनिकीथने आपली विजयाची मालिका कायम ठेवताना पाचव्या फेरीत दुसरी रेसदेखील जिंकली. काल पहिली रेस जिंकणाऱ्या किथने ३१ मि. 0३.१५३ सेकंदांत ही रेस जिंकली. थायलंडच्या देचा क्रॅसार्ता ३१ मि. ०६.३५२ सेकंदांसह दुसरे आणि मलेशियाच्या अझलान शाह कामारूजमने ३१ मि. १0.६९१ सेकंदांसह तिसरे स्थान मिळवले.