भारतीय नेमबाजांची प्रगती हे सकारात्मक बदलांचे फळ: अभिनव बिंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 07:57 AM2021-07-18T07:57:33+5:302021-07-18T07:58:45+5:30

टोकियोमध्ये ऑलिम्पिकची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भारताच्या दृष्टीने आमचे नेमबाज सतत तयारीत व्यस्त असून, आयुष्यात धावण्याची गती आता आणखी वेग घेऊ लागली.

abhinav bindra says progress of Indian shooters is the fruit of positive change | भारतीय नेमबाजांची प्रगती हे सकारात्मक बदलांचे फळ: अभिनव बिंद्रा

भारतीय नेमबाजांची प्रगती हे सकारात्मक बदलांचे फळ: अभिनव बिंद्रा

googlenewsNext

टोकियोमध्ये ऑलिम्पिकची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भारताच्या दृष्टीने आमचे नेमबाज सतत तयारीत व्यस्त असून, आयुष्यात धावण्याची गती आता आणखी वेग घेऊ लागली. खेळातील कारभारात झालेल्या सुधारणेचे परिणामदेखील पुढे येत आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास भारतीय खेळाडू इतके प्रतिस्पर्धी कधीच नव्हते. सध्या मात्र सर्वोत्तम मानांकनात आहेत. ऐतिहासिक कामगिरीची त्यांच्याकडे संधी आहे. कोरोना काळात त्यांनी शिस्तबद्ध तयारी केली. मागच्या २० वर्षांच्या तुलनेत जे स्रोत अलीकडे उपलब्ध झाले त्यातून सर्वात चांगले खेळाडू घडू शकले. नेमबाजी संघानेदेखील उपलब्ध झालेली आर्थिक मदत आणि इतर सुविधांचा पुरेपूर वापर केला.

असे म्हटले जाते की, ऑलिम्पिक चळचळ ही स्पर्धेपेक्षा मोठी असते. येथे उत्कृष्टता, मैत्री आणि आदर ही मूल्ये खेळाडूंना विशेष बनवितात. केवळ पदक जिंकण्यासाठी खेळतो असे नाही तर आम्ही आमच्या देशाचे आणि ऑलिम्पिकचे राजदूत म्हणून येथे वावरतो. खेळाइतके सामर्थ्य दुसऱ्या कशातच नाही.
खेळात कसे जिंकता येईल हे तर शिकतोच, पण समोरच्याला कसे पराभूत करता येईल, हे देखील शिकतो. नियमांचे प्रामाणिकपणा आणि सचोटीचे पालन करणे शिकतो. एक ध्येय ठेवणे आणि ते साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करणे शिकतो. इतरांचे ऐकणे आणि त्यांना सन्मान देणे शिकतो. आमचा समाज इतरांचे ऐकत नसेल तर खेळाच्या माध्यमातून आपण इतरांचा आदर करू या. त्यांच्याशी मैत्री वृद्धिंगत करू या...

थोडे मागे जाऊ या. २०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये माघारल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या टार्स्क फोर्सने भारताची कामगिरी उंचावण्यास मदत झाली. याचे श्रेय खेळाडूंना द्यावे लागेल. गेल्या चार वर्षांत बरेच पाणी वाहून गेले आहे. या काळात आम्ही आमच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करीत राहिलो. आधी काय होतो, यापेक्षा पुढचा दिवस कसा चांगला राहील, याचा नेहमी विचार केलेला बरा. गेल्या काही वर्षांत सकारात्मक गोष्टी घडल्या. सहकार्याची भावना आपल्याला अधिक झेप घेण्यास बळकट करेल, अशी आशा करू या.

- ऑलिम्पिकची मूल्ये खेळाडूला आयुष्याचा मार्ग शिकवितात. म्हणूनच खेळाडूंचे वर्तन समाजासाठी प्रासंगिक ठरावे. पदके जिंकणे विलक्षण असते, पण खेळाची खरी शक्ती क्रीडा स्पर्धेच्या निकालाच्या पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणात समाजावर प्रभाव पाडत असते.

- याबाबत अद्‌भूत असे उदाहरण माझ्या डोळ्यापुढे आहे. इटालियन नेमबाज आणि तिहेरी ऑलिम्पिक चॅम्पियन निकोलो कॅंप्रियानी यांच्यासोबत सुरू असलेला माझा शरणार्थी प्रकल्प. हे कार्य माझ्या अंतःकरणाच्या अगदी जवळ आहे. यातील काही जण टोकियो स्पर्धा करतील. त्यांचे आयुष्य बदलले. विचलित, दु:खी मानव ते क्रीडापटू! त्यांच्या डोळ्यातील चमक आणि ध्येय. आपण म्हणू शकतो की, खेळाने त्यांच्या आयुष्याला कलाटणीे दिली.

(अभिनव बिंद्रा हे चॅम्पियन नेमबाज असून, २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकचे १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्ण विजेते आहेत.)
 

Web Title: abhinav bindra says progress of Indian shooters is the fruit of positive change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.