अभिजित कोळपे बातमी : ध्वजारोहणाचा मान कामगारांना मिळावा
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:16+5:302015-01-23T23:06:16+5:30
घोडेगाव : देशात स्वच्छ भारत अभियान सुरू असताना यामध्ये दररोज परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करणार्या सफाई कामगारांना २६ जानेवारीच्या ध्वजारोहणाचा बहुमान मिळावा, अशी मागणी अनुसूचित जाती बचाव कृती समितीचे अध्यक्ष नंदकुमार बोर्हाडे यांनी केली आहे.

अभिजित कोळपे बातमी : ध्वजारोहणाचा मान कामगारांना मिळावा
घ डेगाव : देशात स्वच्छ भारत अभियान सुरू असताना यामध्ये दररोज परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करणार्या सफाई कामगारांना २६ जानेवारीच्या ध्वजारोहणाचा बहुमान मिळावा, अशी मागणी अनुसूचित जाती बचाव कृती समितीचे अध्यक्ष नंदकुमार बोर्हाडे यांनी केली आहे. ध्वजारोहणाचा मान हा स्थानिक परिस्थितीनुसार सन्मानित अधिकारी, पदाधिकारी व सक्षम व्यक्तीस मिळतो; परंतु नगरपालिका, ग्रामपंचायती, शासकीय कार्यालये अशा सार्वजनिक ठिकाणी कायम परिसर स्वच्छ ठेवणार्या सफाई कामगारांना ध्वजारोहणाचा बहुमान कधीही मिळत नाही. सध्या देशभर स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. त्या अभियानात खर्या अर्थाने काम करणार्या सफाई कामगारांना २६ जानेवारी रोजी हा बहुमान मिळावा, अशी मागणी निवदेनाद्वारे नंदकुमार बोर्हाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या निवदेनाच्या प्रती त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनाही दिल्या आहेत.