एबी डिव्हिलिअर्सने सचिन, सौरभ आणि धोनीला टाकलं मागे

By Admin | Updated: February 25, 2017 17:00 IST2017-02-25T16:52:35+5:302017-02-25T17:00:58+5:30

डिव्हिलिअर्सच्या नावे एक नवा विक्रम नोंद झाला असून भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनीला त्याने मागे टाकलं आहे

AB de Villiers left behind Sachin, Saurabh and Dhoni | एबी डिव्हिलिअर्सने सचिन, सौरभ आणि धोनीला टाकलं मागे

एबी डिव्हिलिअर्सने सचिन, सौरभ आणि धोनीला टाकलं मागे

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. शनिवारी न्यूझीलंडविरोधात खेळण्यासाठी जेव्हा डिव्हिलिअर्स मैदानात उतरला तेव्हा काही वेळातच त्याने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. फलंदाजी करताना डिव्हिलिअर्सने पाच धावा पुर्ण करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9000 धावाही पुर्ण केल्या. यासोबतच डिव्हिलिअर्सच्या नावे एक नवा विक्रम नोंद झाला असून भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनीला त्याने मागे टाकलं आहे.
 
डिव्हिलिअर्स एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 9000 धावा पुर्ण करणार फलंदाज ठरला आहे. 9000 धावांचा टप्पा पुर्ण करण्यासाठी डिव्हिलिअर्सला फक्त 205 डाव खेळावे लागले. हा नवा विक्रम आपल्या नावे करताना डिव्हिलिअर्सने सौरभ गांगुली (228), सचिन तेंडुलकर (235), ब्रायन लारा (239), रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस (242) आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी (244) यांना मागे टाकलं आहे. 
 
सर्वात कमी एकदिवसीय सामने खेळताना डिव्हिलिअर्सने हा रेकॉर्ड केला. फक्त 214 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 9000 धावा पुर्ण केल्या आहे. यामध्येही डिव्हिलिअर्सने सौरभ गांगुली (236), सचिन तेंडुलकर (242), लारा (246) आणि रिकी पाँटिंग (248) यांना मागे टाकलं आहे. 
 
9000 धावा पुर्ण करणा-या फलंदाजांच्या यादीत डिव्हिलिअर्स सरासरीमध्येही सर्वांच्या पुढे असून त्याची फलंदाजी सरासरी 53.89 आहे. सरासरीच्या यादीत डिव्हिलिअर्सनंतर एम एस धोनीचा नंबर असून धोनीने 51.14 च्या सरासरीने 9000 धावा पुर्ण केल्या होत्या.
 

Web Title: AB de Villiers left behind Sachin, Saurabh and Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.