शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नीरज चोप्राकडे हंगेरियन महिलेने तिंरग्यावर मागितला ऑटोग्राफ; 'गोल्डन बॉय'ची मन जिंकणारी कृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 10:33 IST

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. पण, हा इतिहास घडवूनही नीरज पहिल्यासारखाच सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसला. बुडापेस्ट येथे उपस्थित भारतीयांचे त्याने आभार मानले.

Neeraj Chopra - वर्ल्ड चॅम्पियन बनूनही नीरज चोप्राचे ( Neeraj Chopra) पाय जमिनीवरच आहेत... ऑलिम्पिक सुवर्ण आणि जागतिक स्पर्धेतील सुवर्ण... जिंकणारा तो नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यानंतरचा दुसरा भारतीय आहे. पण, जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. पण, हा इतिहास घडवूनही नीरज पहिल्यासारखाच सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसला. बुडापेस्ट येथे उपस्थित भारतीयांचे त्याने आभार मानले. पाकिस्तानी मित्र अन् प्रतिस्पर्धी अर्शद नदीमसोबत त्याने फोटोही काढले... भारतीय पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. नीरज हा फक्त भारतापुरता मर्यादित नाही, तर तो जगात फेमस आहे. म्हणूनच त्याची पत्रकार परिषद संपताच हंगेरियन महिला त्याच्याजवर तिरंगा घेऊन आली अन् त्यावर तिने गोल्डन बॉयचा ऑटोग्राफ मागितला. पण, त्याने वहा साईन नही कर सकता असे स्पष्ट सांगितले अन् त्या महिलेच्या टी शर्टवर ऑटोग्राफ दिला. नीरजने काल ८८.१७ मीटर लांब भाला फेकून सुवर्णपदक निश्चित केलं. पाकिस्तानचा अर्शद नदीमने ८७.८२ मीटर अंतर पार करून रौप्यपदक, तर झेक प्रजासत्ताकच्या याकुब व्हॅडलेच्जने ( ८६.६७ मी.) कांस्यपदक जिंकले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर नीरज म्हणाला, ''सर्वच बोलत होते की हेच एक पदक राहिले आहे आणि आज तेही पूर्ण झाले. ९० मीटरचं टार्गेट आजही पूर्ण करू शकलो नाही, पण सुवर्ण जिंकलो. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता पुढे अजून बऱ्याच स्पर्धा आहेत आणि त्यात ९० मीटर भाला फेकण्याचा प्रयत्न नक्की करीन. त्या स्पर्धांमध्ये आणखी जास्त जोर लावेन.''

''पहिला थ्रो मला चांगला फेकायचा होता, परंतु तांत्रिक फाऊल झाला. त्यानंतर थोडा निराश झालो, परंतु मी स्वतःला अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी पूश केलं. भारतवासीयांना हे सांगू इच्छितो की, हे तुमचं पदक आहे. आज जागे राहून माझी मॅच पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे आभार. मी आता ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन आहे. तुम्हीही जगात देशाचे नाव मोठं करू शकता. त्यासाठी मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा,'' असेही तो म्हणाला. 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राIndiaभारत