" ७५ लाख आॅलिम्पिक गोल्ड विजेत्यास मिळणार
By Admin | Updated: January 30, 2015 00:46 IST2015-01-30T00:46:53+5:302015-01-30T00:46:53+5:30
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आॅलिम्पिकसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक मिळविणा-या खेळाडूंच्या बक्षिसाची रक्कम

" ७५ लाख आॅलिम्पिक गोल्ड विजेत्यास मिळणार
नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आॅलिम्पिकसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक मिळविणा-या खेळाडूंच्या बक्षिसाची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार आता या स्पर्धेत गोल्ड मिळविणाऱ्या खेळाडूला ७५ लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे़
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आॅलिम्पिकमध्ये रौप्य विजेत्या खेळाडूला ५० आणि कांस्य विजेत्याला ३० लाख रुपये देण्यात येतील़ पूर्वी आॅलिम्पिक गोल्ड विजेत्याला ५०, रौप्य मिळविणाऱ्यास ३० आणि कांस्यपदकासाठी २० लाख देण्यात येत होते़
तसेच आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण मिळविल्यास ३० लाख आणि रौप्यपदक विजेत्याला २० आणि कांस्य विजेत्या खेळाडूला १० लाख रुपये प्रदान करण्यात येतील़ पूर्वी ही रक्कम अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकासाठी २०, १० आणि ६ लाख अशी होती़ (वृत्तसंस्था)