ऑईल मिलचे ७० हजारांचे भंगार चोरीस
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30
लासूर स्टेशन: मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून बंद ऑईल मिलचे ७० हजारांचे भंगार सोमवारी (दि. १५) पहाटे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

ऑईल मिलचे ७० हजारांचे भंगार चोरीस
ल सूर स्टेशन: मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून बंद ऑईल मिलचे ७० हजारांचे भंगार सोमवारी (दि. १५) पहाटे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. लासूर स्टेशनलगत असलेल्या देवगाव रस्त्यावरील बंद राज ऑईल मिलमधील भंगार नेणे सोपे व्हावे म्हणून बाजूला असलेल्या सराफ मंगल कार्यालयाची मुख्य गेटची कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. शेजारीच असलेल्या मिलच्या कुंपणाच्या तारा तोडून शटर उघडून मिलमधील लोखंडी बार, लोखंडी साहित्य एका गाडीत भरून नेले.शेतात उमटलेल्या पायाच्या खुनावरून पाच-सहा चोरटे असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. संतोष कर्नावट यांनी दिलेल्या फिर्यादीत ७० हजारांचे भंगार चोरी गेल्याचे म्हटले आहे़ गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे या परिसरातील लाईटचे खांब पडल्यामुळे या परिसरात लाईट चार दिवसांपासून नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दोन दिवसांपूर्वी याच परिसरातील चोरट्यांनी विद्युत डीपी लांबविली होती़ याबाबत संतोष कर्नावट यांनी शिल्लेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे, अशोक गंगावणे करीत आहे.