५०० वी कसोटी; ५०० पदार्थ!

By Admin | Updated: September 18, 2016 05:48 IST2016-09-18T05:48:36+5:302016-09-18T05:48:36+5:30

ग्रीनपार्क स्टेडियम कानपूर येथे भारतीय क्रिकेट इतिहासातील ५०० वा कसोटी सामना खेळला जाणार आहे.

500th Test; 500 substances! | ५०० वी कसोटी; ५०० पदार्थ!

५०० वी कसोटी; ५०० पदार्थ!


कानपूर : ग्रीनपार्क स्टेडियम कानपूर येथे भारतीय क्रिकेट इतिहासातील ५०० वा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला अविस्मरणीय बनविण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खास तयारी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यासाठी खेळाडू आणि माजी कर्णधारांना ५०० पदार्थांची खास मेजवानी देण्यात येईल, अशी माहिती एका हॉटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मल्होत्रा यांनी दिली. खेळाडूंसाठी शहरातील नामांकित हॉटेल ‘बुक’ करण्यात आली आहेत.
मल्होत्रा म्हणाले, ‘‘भारतीय संघ आज शहरात पोहोचेल. त्यांचे स्वागत भारतीय परंपरेनुसार करण्यात येईल. ग्रीनपार्क स्टेडियमवर भारतीय क्रिकेट इतिहासातील ऐतिहासिक सामना होत आहे. ही बाब या शहरासाठी गौरवास्पद आहे. विराट कोहली पाच स्टोरीवाला केक कापणार आहे.’’
हा सामना पाहण्यासाठी भारताचे माजी कसोटी कर्णधारसुद्धा उपस्थित राहतील. माजी खेळाडंूचा सन्मानही मोठ्या थाटामाटात होईल. त्यांच्यासाठी बीसीसीआयने खास व्यवस्था केली आहे. खेळाडूंच्या मनोरंजनासाठी डीजे, जिम, वाय-फाय आदी व्यवस्था करण्यात आली
आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: 500th Test; 500 substances!