अमलाची क्रिकेटमध्ये ५0 शतके
By Admin | Updated: February 11, 2017 00:41 IST2017-02-11T00:41:28+5:302017-02-11T00:41:28+5:30
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमलाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५0 शतके पूर्ण केली. अशी कामगिरी करणारा तो जगातील सातवा फलंदाज बनला आहे.

अमलाची क्रिकेटमध्ये ५0 शतके
सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमलाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५0 शतके पूर्ण केली. अशी कामगिरी करणारा तो जगातील सातवा फलंदाज बनला आहे. या यादीत भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर १00 शतकांसह अव्वल स्थानावर आहे.
अमलाने श्रीलंकेविरुद्ध पाचव्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावून ही कामगिरी केली. या शैलीदार फलंदाजाने १00 कसोटी सामन्यांत २६ आणि १४५ वन-डे सामन्यांत २४ शतके ठोकली आहेत. अमलाआधी तेंडुलकर (१00 शतके), आॅस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (७१), श्रीलंकेचा कुमार संगकारा (६३), आफ्रिकेचा जॅक कॅलिस (६२), श्रीलंकेचा माहेला जयवर्धने (५४) व वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा (५३) यांनी ही कामगिरी केली आहे. या यादीतील फक्त अमलाच सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. आफ्रिकेचा डिव्हिलियर्स (४५ शतके) व भारताचा कोहली (४३)देखील या यादीच्या मार्गावर आहेत.