वर्ल्डकपमधून ५ लॅपटॉपची चोरी

By Admin | Updated: February 12, 2015 06:24 IST2015-02-12T06:24:23+5:302015-02-12T06:24:23+5:30

आयसीसी वन-डे वर्ल्डकप सुरू होण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना अ‍ॅक्रिडेशन सेंटरमधून ५ लॅपटॉप चोरीला गेल्याचे वृत्त आहे़

5 laptop theft from the World Cup | वर्ल्डकपमधून ५ लॅपटॉपची चोरी

वर्ल्डकपमधून ५ लॅपटॉपची चोरी

ख्राईस्टचर्च : आयसीसी वन-डे वर्ल्डकप सुरू होण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना अ‍ॅक्रिडेशन सेंटरमधून ५ लॅपटॉप चोरीला गेल्याचे वृत्त आहे़
केंटरबरी येथील पोलीस अधिकारी गॅरी नोल्स यांनी सांगितले, की ही चोरी शनिवारी रात्री हेगले नॅटबॉल सेंटरमध्ये झाली; मात्र त्यामुळे वर्ल्डकपच्या सुरक्षाव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही.
या स्पर्धेच्या सुरक्षाव्यवस्थेवर परिणाम होईल, अशी कोणतीही माहिती चोरीला गेलेल्या लॅपटॉपमध्ये नव्हती़ या सर्व लॅपटॉपमध्ये पासवर्ड टाकलेले आहेत, अशी माहिती नोल्स यांनी दिली आहे़
सामन्यांना तुफान गर्दी
मेलबोर्न : आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमधील सामन्यांना क्रीडाप्रेमींची तुफान गर्दी बघायला मिळेल, अशी माहिती आयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन हार्नडेन यांनी दिली आहे़
(वृत्तसंस्था)

Web Title: 5 laptop theft from the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.