शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

आयपीएलसाठी ३५१ खेळाडूंचा लिलाव

By admin | Updated: January 31, 2016 03:12 IST

इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रासाठी येत्या ६ फेब्रुवारीस खेळाडूंचा लिलाव होत आहे. एकूण ७१४ खेळाडूंच्या पूलमधून ३५१ खेळाडू लिलावास उपलब्ध राहतील. ईशांत आणि

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रासाठी येत्या ६ फेब्रुवारीस खेळाडूंचा लिलाव होत आहे. एकूण ७१४ खेळाडूंच्या पूलमधून ३५१ खेळाडू लिलावास उपलब्ध राहतील. ईशांत आणि युवराजसह आठ खेळाडूंची बेसप्राईस (आधारभूत किंमत) दोन कोटी असेल. लिलावात भारताचे २३०, तसेच विदेशातील १२१ खेळाडूंचा समावेश राहील. आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी शनिवारी ही माहिती देताना सांगितले, की खेळाडूंच्या लिलावासोबतच नवव्या सत्राला सुरुवात होईल. सर्वच फ्रॅन्चायसी गेल्या काही महिन्यांपासून संघबांधणीची तयारी करीत आहेत. लिलाव स्वरूपात संघात तगडे खेळाडू निवडण्यासाठी चढाओढ दिसेल. नवे संघ पुणे आणि राजकोट हे प्रथमच सहभागी होणार आहेत. भारताचे २६, आॅस्ट्रेलिया २९, बांगला देश ५, इंग्लंड ७, न्यूझीलंड ९, द. आफ्रिका १८, श्रीलंका १६ आणि वेस्ट इंडिजचे २० खेळाडू तसेच २१९ अनकॅप्ड खेळाडूंसह असोसिएट कॅनडा व आयर्लंडचा प्रत्येकी एक खेळाडू लिलावात सहभागी होईल. मोहित शर्मा आणि जोश बटलर यांची बेस प्राईस दीड कोटी, इरफान पठाण आणि टीम साऊदीची एक कोटी असेल. पुणे आणि राजकोट या संघांनी खेळाडूंच्या ड्राफ्टमधून प्रत्येकी पाच खेळाडू निवडले आहेत. दिल्ली डेअरडेव्हिल्सलादेखील संघ पूर्ण करण्यासाठी काही खेळाडू निवडावे लागणार आहेत. सहाफ्रॅन्चायसी संघांनी ३१ डिसेंबरला पहिली ट्रेडिंग विंडो संपल्यानंतर एकूण ६१ खेळाडूंना रिलीज केले. ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लिलावासाठी दिल्लीकडे ३७.१५ कोटी, किंग्स पंजाबकडे २३ कोटी, कोलकाता नाईट रायडर्सकडे १७.९५ कोटी, मुंबई इंडियन्सकडे १४.४० कोटी, बंगळुरुकडे २१.६२ कोटी, सनरायजर्स हैदराबादकडे ३०.१५ कोटी, पुणे संघाकडे २७ कोटी आणि राजकोटकडे २७ कोटी रुपये शिल्लक आहेत.(वृत्तसंस्था)नवव्या सत्रातील लिलावाची वैशिष्ट्ये : ६ फेब्रुवारी रोजी होणार लिलावपुणे, राजकोटला संघांना संधी७१४ खेळाडूंच्या पूलमधून३५१ खेळाडूंवर लागणार बोली२३० भारतीय खेळाडू१२१ परदेशी खेळाडूर्ईशांत शर्मा, युवराजसिंग, शेन वॉटसन, अ‍ॅरॉन फिंच, केव्हिन पीटरसन, डेल स्टेन, मार्टिन गुप्तिल, ड्वेन स्मिथ.