आयपीएलसाठी ३५१ खेळाडूंचा लिलाव
By Admin | Updated: January 31, 2016 03:12 IST2016-01-31T03:12:02+5:302016-01-31T03:12:02+5:30
इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रासाठी येत्या ६ फेब्रुवारीस खेळाडूंचा लिलाव होत आहे. एकूण ७१४ खेळाडूंच्या पूलमधून ३५१ खेळाडू लिलावास उपलब्ध राहतील. ईशांत आणि

आयपीएलसाठी ३५१ खेळाडूंचा लिलाव
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रासाठी येत्या ६ फेब्रुवारीस खेळाडूंचा लिलाव होत आहे. एकूण ७१४ खेळाडूंच्या पूलमधून ३५१ खेळाडू लिलावास उपलब्ध राहतील. ईशांत आणि युवराजसह आठ खेळाडूंची बेसप्राईस (आधारभूत किंमत) दोन कोटी असेल. लिलावात भारताचे २३०, तसेच विदेशातील १२१ खेळाडूंचा समावेश राहील. आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी शनिवारी ही माहिती देताना सांगितले, की खेळाडूंच्या लिलावासोबतच नवव्या सत्राला सुरुवात होईल.
सर्वच फ्रॅन्चायसी गेल्या काही महिन्यांपासून संघबांधणीची तयारी करीत आहेत. लिलाव स्वरूपात संघात तगडे खेळाडू निवडण्यासाठी चढाओढ दिसेल. नवे संघ पुणे आणि राजकोट हे प्रथमच सहभागी होणार आहेत. भारताचे २६, आॅस्ट्रेलिया २९, बांगला देश ५, इंग्लंड ७, न्यूझीलंड ९, द. आफ्रिका १८, श्रीलंका १६ आणि वेस्ट इंडिजचे २० खेळाडू तसेच २१९ अनकॅप्ड खेळाडूंसह असोसिएट कॅनडा व आयर्लंडचा प्रत्येकी एक खेळाडू लिलावात सहभागी होईल.
मोहित शर्मा आणि जोश बटलर यांची बेस प्राईस दीड कोटी, इरफान पठाण आणि टीम साऊदीची एक कोटी असेल. पुणे आणि राजकोट या संघांनी खेळाडूंच्या ड्राफ्टमधून प्रत्येकी पाच खेळाडू निवडले आहेत. दिल्ली डेअरडेव्हिल्सलादेखील संघ पूर्ण करण्यासाठी काही खेळाडू निवडावे लागणार आहेत. सहाफ्रॅन्चायसी संघांनी ३१ डिसेंबरला पहिली ट्रेडिंग विंडो संपल्यानंतर एकूण ६१ खेळाडूंना रिलीज केले. ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लिलावासाठी दिल्लीकडे ३७.१५ कोटी, किंग्स पंजाबकडे २३ कोटी, कोलकाता नाईट रायडर्सकडे १७.९५ कोटी, मुंबई इंडियन्सकडे १४.४० कोटी, बंगळुरुकडे २१.६२ कोटी, सनरायजर्स हैदराबादकडे ३०.१५ कोटी, पुणे संघाकडे २७ कोटी आणि राजकोटकडे २७ कोटी रुपये शिल्लक आहेत.(वृत्तसंस्था)
नवव्या सत्रातील लिलावाची वैशिष्ट्ये :
६ फेब्रुवारी रोजी होणार लिलाव
पुणे, राजकोटला संघांना संधी
७१४ खेळाडूंच्या पूलमधून
३५१ खेळाडूंवर लागणार बोली
२३० भारतीय खेळाडू
१२१ परदेशी खेळाडू
र्ईशांत शर्मा, युवराजसिंग,
शेन वॉटसन, अॅरॉन फिंच,
केव्हिन पीटरसन, डेल स्टेन,
मार्टिन गुप्तिल, ड्वेन स्मिथ.