२५ मी. सेंटर फायर पिस्तूलमध्ये रौप्य
By Admin | Updated: September 27, 2014 02:44 IST2014-09-27T02:44:09+5:302014-09-27T02:44:09+5:30
भारतीय नेमबाजांनी आज सुरुवातीलाच रौप्यपदकाची कमाई केली. लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता विजय कुमार,

२५ मी. सेंटर फायर पिस्तूलमध्ये रौप्य
भारतीय नेमबाजांनी आज सुरुवातीलाच रौप्यपदकाची कमाई केली. लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता विजय कुमार, पेम्बा तमांग व गुरप्रित सिंग यांचा समावेश असलेल्या पिस्तूल संघाने २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल स्पर्धेत एकूण १७४० चा स्कोअर करीत रौप्यपदक पटकाविले. सर्वायकल स्पाँडिलाइटीसने त्रस्त असला तरी विजय रेंजमध्ये उतरला. मायदेशी परतल्यानंतर विजय यावर शस्त्रक्रिया करणार आहे. आशियाई स्पर्धेतील भारतीय नेमबाजांचे हे आठवे पदक आहे. भारतीय नेमबाजांनी एक सुवर्ण, एक रौप्य व सहा कांस्यपदकांची कमाई केली. त्यात केवळ दोन वैयक्तिक पदकांचा समावेश आहे. जितू राय व अभिनव बिंद्रा यांचा अपवाद वगळता इंचियोनमध्ये अन्य भारतीय नेमबाजांना वैयक्तिक स्पर्धेत पदक पटकाविता आलेले नाही. भारतीय महिला संघाला ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय संघात लज्जा गोस्वामी, ४४ वर्षांची अंजली भागवत व तेजस्विनी मुळे यांचा समावेश होता. वैयक्तिक गटात अंतिम फेरीत लज्जा हिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.