..24 वर्षानी अर्जेटिना उपांत्य फेरीत

By Admin | Updated: July 6, 2014 02:17 IST2014-07-06T02:17:33+5:302014-07-06T02:17:33+5:30

अर्जेटिनाने बेल्जियमची झुंज 1-क् ने मोडून काढली आाणि फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत 24 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर उपांत्य फेरीत धडक मारली.

..24-year-old Argentina in the semifinals | ..24 वर्षानी अर्जेटिना उपांत्य फेरीत

..24 वर्षानी अर्जेटिना उपांत्य फेरीत

ब्रासिलिया : गोंजालो हिगुएनने नोंदविलेल्या गोलच्या जोरावर अर्जेटिनाने बेल्जियमची झुंज 1-क् ने मोडून काढली आाणि फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत 24 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर उपांत्य फेरीत धडक मारली. यापूर्वी अर्जेटिनाने इटालिया 9क् मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. त्यावेळी त्यांना अंतिम फेरीत पश्चिम जर्मनीविरुद्ध 1-क् ने पराभव स्वीकारावा लागला होता. अलीकडच्या कालावधीत 2क्क्6 व 2क्1क् मध्ये अर्जेटिना संघाला जर्मनीविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. 
साखळी फेरीत लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या हिगुएनने आज उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आपला दर्जा सिद्ध केला. आठव्या मिनिटाला अँजेल डी मारियाने दिलेल्या पासवर हिगुएनने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवीत संघाचे खाते उघडले. सुरुवातीलाच मिळविलेल्या आघाडीमुळे अर्जेटिना संघाला सामन्यावर पकड मिळविता आली. बेल्जियम संघाने पहिल्या सत्रच्या अखेरच्या टप्प्यात आक्रमक खेळ केला, पण त्यांना बरोबरी साधता आली नाही. अर्जेटिना संघाला 13 व्या मिनिटाला आघाडी वाढविण्याची संधी होती. फॉरवर्ड इङोक्विल लाव्हेझीचे आक्रमण बेल्जियमच्या बचावपटूंनी परतावून लावले. 
 त्याआधी स्ट्रायकर गोंजालो हिगुएनने सुरुवातीला नोंदविलेल्या गोलच्या जोरावर अर्जेटिनाने पहिल्या सत्रत 1-क् अशी आघाडी मिळविली. लियोनल मेस्सीच्या चमकदार कामगिरीपासून प्रेरणा घेत, संघ सहका:यांनीही खेळाचा दर्जा उंचविला. आठव्या मिनिटाला हिगुएनने मिळालेल्या संधीवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवीत अर्जेटिना संघाचे खाते उघडले. दरम्यान, मेस्सी गोल नोंदविण्यासाठी प्रयत्नशली होता, पण त्यात त्याला यश मिळाले नाही. बेल्जियमच्या डी. ब्रुएने 25 मीटर अंतरावरून मारलेला फटका गोलपोस्टच्या जवळून गेला. अखेर हिगुएनने नोंदविलेला गोल निर्णायक ठरला. (वृत्तसंस्था)

 

Web Title: ..24-year-old Argentina in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.