शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Indian wrestlers Visa Denied: स्पेनने भारतीय कुस्तीपटूंचा व्हिसा नाकारला; 21 पैलवान स्पर्धेपासून वंचित राहण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 12:57 IST

अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या 21 भारतीय कुस्तीपटूंचा स्पेनच्या दूतावासाने व्हिसा नाकारला आहे. 

नवी दिल्ली : भारतीयकुस्ती महासंघासाठी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. स्पेनच्या धरतीवर होणाऱ्या आगामी अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या 21 भारतीय पैलवानांचा व्हिसा नाकारण्यात आली आहे. खरं तर शुल्लक कारणावरून व्हिसा नाकारण्यात आला आहे. हे कुस्तीपटू स्पेनमध्ये नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ राहू शकतात, अशी भीती स्पेनच्या दूतावासाने व्यक्त केली आहे. या भीतीमुळे अद्याप व्हिसा मंजूर करण्यात आलेला नाही. एकूण 30 खेळाडूंनी यासाठी अर्ज केले होते, त्यापैकी केवळ 9 खेळाडूंना व्हिसा देण्यात आला आहे. 

21 पैलवान व्हिसा मिळण्याच्या प्रतिक्षेतस्पेनमध्ये होणाऱ्या 23 वर्षांखालील जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतातील 21 कुस्तीपटूंना व्हिसा देण्यात आलेला नाही. हे सर्व कुस्तीपटू 23 वर्षांखालील चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार होते. निर्धारित वेळेनंतर देखील हे खेळाडू स्पनेच्या धरतीवर राहू शकतात या भीतीने स्पेनच्या दूतावासाने व्हिसा मंजूर केला नाही. दूतावासाने दिलेल्या या तर्काने भारतीय अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. खरं तर व्हिसा रद्द करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अमित पंघालचाही समावेश आहे. त्यामुळे कुस्ती महासंघ पुढचे पाऊल काय उचलते हे पाहण्याजोगे असेल. 

कुस्ती महासंघाने व्यक्त केली नाराजी डब्ल्यूएफआयचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी पीटीआयशी संवाद साधताना याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, याआधी अशा परिस्थितीचा सामना आम्हाला कधीच करावा लागला नव्हता. दूतावासाने दिलेला तर्क आमच्यासाठी धक्कादायक आहे. आमचे खेळाडू आणि प्रशिक्षक जबरदस्तीने स्पेनमध्ये राहतील, असे कोणत्या आधारावर सांगितले जात आहे हे आम्हाला अजिबात समजत नाही. ही एक विचित्र आणि आश्चर्यकारक परिस्थिती आहे. भारत सरकारचे मान्यता पत्र आणि जागतिक कुस्तीची प्रशासकीय समिती संयुक्त जागतिक कुस्तीचे (UWW) निमंत्रण पत्र दाखवूनही व्हिसा न देणे हा धक्कादायक निर्णय आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Visaव्हिसाWrestlingकुस्तीIndiaभारत