बीजिंगमध्ये रंगणार २०२२ आॅलिम्पिक
By Admin | Updated: August 1, 2015 00:38 IST2015-08-01T00:38:03+5:302015-08-01T00:38:03+5:30
आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) बीजिंग (चीन) शहराला २०२२ सालच्या हिवाळी आॅलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद बहाल केले आहे. विशेष म्हणजे २००८ साली उन्हाळी आॅलिम्पिक स्पर्धेचे

बीजिंगमध्ये रंगणार २०२२ आॅलिम्पिक
क्वाललांपूर : आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने (आयओसी) बीजिंग (चीन) शहराला २०२२ सालच्या हिवाळी आॅलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद बहाल केले आहे. विशेष म्हणजे २००८ साली उन्हाळी आॅलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषविलेले बीजिंग शहर उन्हाळी व हिवाळी अशा दोन्ही ओलिम्पिकचे यजमानपद भूषविणारे पहिले शहर ठरले आहे.
२०२२ सालच्या हिवाळी आॅलिम्पिकचे यजमानपद पटकावण्याच्या शर्यतीमध्ये बीजिंग समोर काजाकिस्तानच्या अलमाटी शहराचे मोठे आव्हान होते. परंतु, बिजींगने ८५ आयओसी देशांच्या मतांच्या जोरावर बाजी मारली. दरम्यान यावेळी दोन वेळा मतदान झाले. इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर पुन्हा एकदा आयओसी संलंग्न असलेल्या देशांच्या प्रतिनिधींनी कागदावर मतदान केले. यावेळी बिजींगने अलमाटी
शहराचा ४४-४० अशा मताधिक्यांनी पराभव केला. दरम्यान एका
सदस्य देशाने या मतदानामध्ये सहभाग घेतला नाही.
बिजींगमध्ये नैसर्गिक बर्फाची कमतरता असूनही या शहराला २०२२ सालच्या हिवाळी ओलिम्पिकचे यजमानपद देण्यात आले. यास कारण म्हणजे, २००८ साली बिजींगने उन्हाळी आॅलिम्पिकचे यशस्वी आयोजन केले होते. यानुसारच चीनी प्रतिनिधी मंडळाने देखील आयोसीला हिवाळी आॅलिम्पिकच्या यशस्वी आयोजनाचा विश्वास दिला.
दरम्यान, या निर्णयानंतर पुर्व आशियाला सलग तिसऱ्यांदा आॅलिम्पिक खेळांचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. दक्षिण कोरीयाच्या प्योंगचांग शहरामध्ये २०१८ सालचे हिवाळी आॅलिम्पिक आयोजित होणार
असून टोकियो शहर २०२०
सालचे उन्हाळी आॅलिम्पिकचे यजमानपद भूषविणार आहे. या दोन स्पर्धांनंतर चीनच्या बिजींग शहरामध्ये हिवाळी ओलिम्पिकचा क्रीडा कुंभमेळा रंगेल. (वृत्तसंस्था)