शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

२०१४ - कोलकाता पुन्हा विजेता

By admin | Updated: April 8, 2015 15:11 IST

स्पॉट फिक्सिंग व बेटिंगप्रकरणामुळे डागाळलेल्या आयपीएलचे सातवे पर्व लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पार पडले.

स्पॉट फिक्सिंग व बेटिंगप्रकरणामुळे डागाळलेल्या आयपीएलचे सातवे पर्व लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पार पडले. निवडणुकांमुळे सुरक्षा यंत्रणांनी बंदोबस्त पुरवण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे आयपीएलचे सातवे पर्व पुन्हा एकदा भारताबाहेर रंगले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये रंगलेल्या या पर्वाला स्थानिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे शेवटचे सामने भारतातच रंगले. 
पुणे वॉरियर्सने आयपीएलमधून माघार घेतल्याने संघाची संख्या पुन्हा एकदा ८ वर आली.  १८ एप्रिल २०१४ रोजी अबूधाबी येथे चेन्नई सुपर किंग्ज व किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात पहिला सामना पार पडला. या सामन्यात किंग्स इलेव्हनने सहा विकेट्सनी विजय मिळवला. सुरुवातीच्या सात पैकी दोन सामन्यांमध्येच विजय मिळवणा-या कोलकाता नाईट रायडर्सने स्पर्धेत पुनरागमन केले व स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान पटकावले. तर पंजाबनेही सातत्त्यपूर्ण कामगिरी करत फायनलमध्ये धडक दिली. किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबवर तीन विकेट्सनी विजय मिळवत दुस-यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही संघांची मालक हे बॉलीवूडमधील चांगले मित्र आहेत. प्रीती झिंटा ही पंजाब तर शाहरुख खान हा कोलकाता संघाचा मालक आहे.