शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

२०१२ - कोलकाता जितबो रे

By admin | Updated: April 8, 2015 15:10 IST

आयपीएलच्या समितीने कोच्ची टस्कर्सला आयपीएलमधून निलंबित केल्याने आयपीएलच्या पाचव्या पर्वातील संघांची संख्या नऊवर आली.

आयपीएलच्या समितीने कोच्ची टस्कर्सला आयपीएलमधून निलंबित केल्याने आयपीएलच्या पाचव्या पर्वातील संघांची संख्या नऊवर आली. पाचव्या पर्वातही वादाची मालिका सुरुच राहिली. पुणे वॉरियर्सची मालकी असलेल्या सहारा समुहाचे बीसीसीआयसोबत वाजले. आयपीएलच्या लिलावात सहभागी न होता सहाराने बीसीसीआयला दणका दिला. अखेर बीसीसीआय व सहारा यांच्यातील वादावर तोडगा निघाला व पुणे वॉरियर्स संघ आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट झाले. ४ एप्रिल २०१२ रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्याने पाचव्या पर्वाचे बिगूल वाजले. या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नईचा आठ विकेट्सने पराभव केला.
आयपीएलच्या यापूर्वीच्या पर्वात निराशाजनक कामगिरी करणा-या शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाने पाचव्या पर्वात कात टाकली. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कोलकाता नाईट रायडर्सने फायनलमध्ये धडक दिली. फायनलमध्ये कोलकाताची गाठ होती ती सलग दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणा-या चेन्नई सुपर किंग्जशी. चेन्नई सुपर किंग्जने नावाला साजेशी कामगिरी करत कोलकात्यासमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र लढवय्या कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची धुलाई करत पाच विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला.