2011मध्ये हुकलेली संधी त्याला टोचत होती
By Admin | Updated: November 14, 2014 02:18 IST2014-11-14T02:18:08+5:302014-11-14T02:18:08+5:30
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर मुंबईकर रोहित शर्मा चौकार-षटकारांची आतषबाजी करत असताना मुंबईतील बोरिवलीतील त्याच्या घरच्या पत्त्यावरही एक आनंदाचे वारे वाहत होते.

2011मध्ये हुकलेली संधी त्याला टोचत होती
>स्वदेश घाणोकर ल्ल मुंबई
मनाला सातत्याने बोचत राहणारी 2क्11च्या वर्ल्डकप संघातून वगळले गेल्याची सल.. 2क्15चा वर्ल्डकपही भारताला जिंकून देण्याचे स्वप्न उराशी बाळगून गेली तीन-साडेतीन वर्षे आपल्या कामगिरीत सुधारणा करणा:या रोहितने आपल्याला आज जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनवले, अशी प्रतिक्रिया देताना रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. श्रीलंकेविरोधात 264 धावांची त्याची धुव्वाधार फलंदाजी ही सर्वासाठी एक पर्वणी होती, अशी भावनाही खास ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर मुंबईकर रोहित शर्मा चौकार-षटकारांची आतषबाजी करत असताना मुंबईतील बोरिवलीतील त्याच्या घरच्या पत्त्यावरही एक आनंदाचे वारे वाहत होते. रोहितकडून अशा प्रकारचा खेळ पहिल्यांदा होतोय, असेही नाही; परंतु आगामी वल्र्डकपच्या दृष्टीने ही खेळी रोहितला बुस्ट करणारी होती. अगदी सहजतेने तो o्रीलंकन गोलंदाजांच्या चिंधडय़ा उडवत होता. त्याची ही खेळी 2क्15च्या वल्र्डकपच्या दृष्टीने रंगीत तालीम होती, असेही लाड म्हणाले.
दुर्दैवाने रोहितचा आजचा खेळ पाहता आला नाही; परंतु हायलाइट्स नक्की पाहीन, असे लाड सरांनी सांगितले. गेली कित्येक महिने दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या रोहितने o्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात दमदार शतक ठोकून कमबॅक केले. त्याच्या या खेळीतून त्याच्यातील आत्मविश्वास प्रकर्षाने जाणवला. तो यशस्वी नक्की होणार, असे लाड सरांनी सांगितले. ते म्हणाले, 2क्11च्या वल्र्डकप संघातून वगळल्यानंतर तो खूप निराश झाला. त्याचा आत्मविश्वास डगमगडला होता; परंतु 2क्15च्या वल्र्डकपमध्ये संघात स्थान मिळवायचे आणि भारताला जेतेपद पटकावून द्यायचे, या निर्धारानेच तो सातत्याने सराव करत
होता. त्याच्या या वाटचालीत दुखापतीने खो घालण्याचा प्रय} केला; परंतु त्यावरही मात करून तो ध्येयाच्या
दिशेने वाटचाल करत होता. आज त्याच्या या मेहनतीचे चीज झाले.
भारतीय खेळपट्टी आणि ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथील खेळपट्टी यांत जमीन-आसमानाचा फरक आहे. रोहित हीच कामगिरी तेथेही करेल, अशी अपेक्षा करणो योग्य आहे का? यावर लाड म्हणाले, त्याचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. त्याचा हाच आत्मविश्वास ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये पाहायला मिळेल.