२००७ - ऑस्ट्रेलियाची हॅट्रीक

By Admin | Updated: February 15, 2015 16:11 IST2015-02-15T16:10:34+5:302015-02-15T16:11:04+5:30

श्रीलंकेचा ५३ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदाची हॅट्रीक साधली.

2007 - Australian hat-trick | २००७ - ऑस्ट्रेलियाची हॅट्रीक

२००७ - ऑस्ट्रेलियाची हॅट्रीक

>दोन वेळा विश्वचषक विजेतेपद पटकावणा-या वेस्ट इंडिजला २००७ मध्ये विश्वचषकाचे यजमानपद मिळाले. १३ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत विश्वचषकाचे नववे पर्व पार पडले. विश्वचषकातील संघांची संख्या १६ पर्यंत नेण्यात आली. हे विश्वचषक पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वुल्मर यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे चर्चेचा विषय ठरला. 
नवव्या विश्वचषकात पॉवर प्लेची संख्या वाढवण्यात आली. याशिवाय सुपर एटमधून चार संघांना सेमीफायनलमध्ये प्रवेश दिला जाणार होता. बांग्लादेशने भारत व दक्षिण आफ्रिका सारख्या बलाढ्य संघांचा या विश्वचषकात पराभव केला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. या सामन्याच्या दुस-याच दिवशी पाकचे प्रशिक्षक बॉब वुल्मर यांचा हॉटेलमधील खोलीत संशयास्पद मृत्यू झाला. या धक्क्यातून पाक संघ सावरु शकला नाही आणि साखळी फेरीतच हा संघ बाद झाला. भारताचीही या विश्वचषकात अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली. दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने नेदरलँडविरुद्ध एका षटकांत ठोकलेले सहा षटकार आणि श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने दक्षिण आफ्रिकेविरोधात ४ चेंडूत घेतलेल्या ४ विकेट या विश्वचषकाचे आकर्षण ठरले. 
बार्बाडोसच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामना पार पडला.  सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टने १०४ चेंडूत १४९ धावा करत श्रीलंकेच्या गोलंदाजांना अक्षरशः चोपून काढले. ऑस्ट्रेलियाने ३८ षटकांत २८१ धावा केल्या. या सामन्यात श्रीलंकेचा ५३ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदाची हॅट्रीक साधली. 
 
हा खेळ आकड्यांचा
एकूण सामने - ५१
एकूण धावा - २१,३३३
एकूण विकेट्स - ७२२ विकेट
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - मॅथ्यू हेडन - ऑस्ट्रेलिया (११ सामन्यात ६५९ धावा)
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज -  ग्लेन मॅकग्रा - ऑस्ट्रेलिया (११ सामन्यात २६ विकेट्स)
 

Web Title: 2007 - Australian hat-trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.