१९... कोदामेंढी क्रीडा
By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:04+5:302014-12-19T22:57:04+5:30
(फोटो)

१९... कोदामेंढी क्रीडा
(फ ोटो)बिटस्तरीय क्रीडा स्पर्धेची सांगताकोदामेंढी : नजीकच्या अरोली येथे बिटस्तरीय क्रीडा महोत्सवाची नुकतीच सांगता करण्यात आली. या स्पर्धेत २५ शाळांमधील विविध संघांनी भाग घेतला होता. पंचायत समिती सभापती मनोज कोठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच नंदू धानकुटे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य शकुंतला हटवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदानंद निमकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती अशोक हटवार, पंचायत समिती सदस्य नलिनी पठाळे, सुनील आरभी, सुनील हजारे, गजानन मेहर, कैलास समरीत, सरपंच योगीता नाटकर उपस्थित होते.या स्पर्धेत एकूण २५ शाळांमधील विविध खेळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी शीला गेडाम यांनी केले. कार्यक्रमाला केंद्र प्रमुख अनिल यादव, वसंत झाडे, गजानन मेश्राम, आर. एम. वैद्य, सुरेश धुर्वे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)***