१९९६ - श्रीलंकेचे वर्चस्व

By Admin | Updated: February 15, 2015 16:01 IST2015-02-15T16:01:10+5:302015-02-15T16:01:10+5:30

सहावे विश्वचषक पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान व श्रीलंका या भारतीय उपखंडात पार पडले. या विश्वचषकात ९ ऐवजी १२ संघाना स्थान देण्यात आले.

1996 - Sri Lankan domination | १९९६ - श्रीलंकेचे वर्चस्व

१९९६ - श्रीलंकेचे वर्चस्व

>सहावे विश्वचषक पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान व श्रीलंका या भारतीय उपखंडात पार पडले. या विश्वचषकात ९ ऐवजी १२ संघाना स्थान देण्यात आले. हॉलंड, केनिया व यूएई या नव्या देशांना क्रिकेट विश्वचषकात खेळण्याची संधी देण्यात आली. 
१४ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पाचवे विश्वचषक पार पडले. यामध्ये भारतात १७, पाकिस्तानमध्ये सहा आणि श्रीलंकेत तीन सामने पार पडले. सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज या संघांनी श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला. हीच बाब श्रीलंकेच्या पथ्यावर पडली आणि या संघाने थेट क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. कोलकाता येथील ईडन गार्डनवरील सेमी फायनलमध्ये श्रीलंकेविरोधात भारताला पराभव स्वीकारावा लागल्याने स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांनी खुर्च्यांना आग लावणे, मैदाना बाटल्या फेकणे अशा घटना घडल्या होत्या. 
लाहोरमध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचे २४१ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने अरविंद डिसील्वाच्या नाबाद शतकाच्या आधारे फक्त तीन गडी गमावून गाठले. भारत, पाकिस्तानपाठोपाठ विश्वचषकाचे जेतेपद पटकावणारा श्रीलंका तिसरा देश ठरला. 
 
हा खेळ आकड्यांचा
एकूण सामने - ३७
एकूण धावा - १५, २२५ 
एकूण विकेट्स - ४७५
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - सचिन तेंडुलकर - भारत - सात सामन्यांमध्ये ५२३ धावा
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज - अनिल कुंबळे - भारत - सात सामन्यांमध्ये १५ विकेट

Web Title: 1996 - Sri Lankan domination