१९९२ - नवे नियम, नवा विजेता

By Admin | Updated: February 15, 2015 15:54 IST2015-02-15T15:54:47+5:302015-02-15T15:54:47+5:30

पांढरा चेंडू, रंगीत कपडे, ब्लॅक स्क्रीनचा वापर आणि डे नाईट सामने असे नवनवीन प्रयोग या विश्वचषकात करण्यात आल्याने हे विश्वचषक क्रिकेटमध्ये रंगीत दिवस आणणारे ठरले.

1992 - New rules, new winners | १९९२ - नवे नियम, नवा विजेता

१९९२ - नवे नियम, नवा विजेता

>पाचवे विश्वचषक ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये २२ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालवधीत पार पडले. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय पांढरा चेंडू, रंगीत कपडे, ब्लॅक स्क्रीनचा वापर आणि डे नाईट सामने असे नवनवीन प्रयोग या विश्वचषकात करण्यात आल्याने हे विश्वचषक क्रिकेटमध्ये रंगीत दिवस आणणारे ठरले. याशिवाय पहिल्या १५ षटकांमध्ये क्षेत्ररचनेवर निर्बंध घालण्याचा नवा नियमही या विश्वचषकात लागू झाला. या नव्या नियमामुळे वन डे सामन्यांमधील रोमांच आणखी वाढला.  
पाचव्या विश्वचषकात ९ संघ सहभागी असल्याने तब्बल ३६ सामने खेळवण्यात आले. यातून चार सर्वोत्तम संघांची सेमीफायनल व त्यामधील विजेत्यांमध्ये अंतिम लढत असे विश्वचषकाचे फॉर्मेट होते. मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा २२ धावांनी पराभव केला व इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाक संघाने प्रथमच विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. 
 
हा खेळ आकड्यांचा
एकूण सामने - ३९
एकूण धावा - १५, १०७
एकूण विकेट्स - ५१४ 
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - मार्टिन क्रो - न्यूझीलंड- (९ सामन्यांमध्ये ४५६ धावा)
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज - वासिम अक्रम - पाकिस्तान (१० सामन्यांमध्ये १८ विकेट्स)
 

Web Title: 1992 - New rules, new winners