१९८७ - ऑस्ट्रेलिया जगज्जेता
By Admin | Updated: February 15, 2015 15:49 IST2015-02-15T15:49:59+5:302015-02-15T15:49:59+5:30
भारतीय उपखंडात रंगलेल्या या विश्वचषकात ६० ऐवजी ५० षटकांचा सामना खेळवण्यात आला.

१९८७ - ऑस्ट्रेलिया जगज्जेता
>चौथे क्रिकेट विश्वचषक इंग्लंडच्या बाहेर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. ८ ऑक्टोंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत रंगलेल्या चौथ्या विश्वचषकाचे भारत व पाकिस्तानने संयुक्त आयोजन केले होते. भारतीय उपखंडात रंगलेल्या या विश्वचषकात ६० ऐवजी ५० षटकांचा सामना खेळवण्यात आला. या विश्वचषकात कसोटी खेळणा-या देशांसोबतच झिम्बाब्वेला स्थान देण्यात आले.
गतविजेता भारत घरच्या मैदानावर विजेतेपद कायम राखेल अशी आशा होती. पण भारतीय क्रिकेट प्रेमींच्या पदरी निराशाच पडली. या विश्वचषकात वेस्ट इंडिजची वाताहत झाली. दोनदा विश्वचषक पटकावणारा वेस्ट इंडिजचा संघ १९८७ मध्ये पात्रता फेरीनंतरच मायदेशी परतला. कोलकाता येथील ईडन गार्डनवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा सात धावांनी पराभव करत विश्वचषकाच्या जेतेपदाला गवसणी घातली.
हा खेळ आकड़्यांचा
एकूण सामने - २७
एकूण धावा - १२, ५२२
एकूण विकेट्स - ३८५
सर्वाधिक धावा - ग्राहम गूच - इंग्लंड (आठ सामन्यांत ४७१ धावा)
सर्वाधिक विकेट्स - क्रेग मॅकडर्मोट (आठ सामन्यांत १८ विकेट)