शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 05:41 IST

महाराष्ट्रकन्या दिव्या तुझा अभिमान आहे...

बाटुमी (जॉर्जिया) : टायब्रेकरचा सामना सुरू. समोर साक्षात ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी. खेळ संपत आलेला. शेवटच्या काही चाली बाकी. दिव्या देशमुखचा मेंदू दबावात. कोनेरूने पुढची चाल खेळली. आक्रमक दिव्याच्या तीक्ष्ण मेंदूने क्षणार्धात संधी ओळखली. एकच चाल अन् चेकमेट! कोनेरूला कळलं होतं... कोनेरूनं हात पुढं केला... येस्स... दिव्या, यू डीड इट! दिव्याच्या डोळ्यांतून झरझर वाहू लागले... अवघ्या १९ वर्षांच्या छोकरीने बुद्धिबळ विश्वचषक पटकावला. साेबतच ती ८८वी भारतीय ग्रँडमास्टरही झाली... महाराष्ट्राच्या लेकीनं इतिहास रचला... अवघा देश आनंदला! दिव्या, तुझा आम्हाला अभिमान आहे... 

इतिहासात प्रथमच कोरले भारताचे नाव

महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचे नाव विश्वचषकावर कोरले गेले. या दोघींच्या आधी कोणत्याही भारतीय खेळाडूने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली नव्हती. नागपूरकर दिव्याने टायब्रेकरमध्ये पहिला डाव बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या डावात वेगवान खेळ करत हम्पीवर दडपण टाकले. दडपणात आलेल्या हम्पीकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या दिव्याने कमाल केली. 

चार भारतीय महिला होत्या उपांत्यपूर्व फेरीत

कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली, वैशाली रमेशबाबू आणि दिव्या देशमुख या चार भारतीय महिला खेळाडूंनी या स्पर्धेत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय बुद्धिबळासाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे.

डोम्मराजू गुकेश गेल्या वर्षी विश्वविजेता

१९ वर्षीय भारतीय डोम्मराजू गुकेश गेल्या वर्षी पुरुष बुद्धिबळात विश्वविजेता बनला. १२ डिसेंबर २०२४ रोजी त्याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी चीनच्या डिंग लिरेनला हरवून विजेतेपद पटकावले.

दिव्याने रचला इतिहास, ‘दिव्या’ खास का?

१७ व्या वर्षी दोन वेळा राष्ट्रीय महिला विजेतेपद, १८ व्या वर्षी पहिले वुमेन्स कॉन्टिनेंटल विजेतेपद, बनली आशियाची बुद्धिबळ राणी, गेल्या वर्षी जूनमध्ये अंडर-२० वर्ल्ड ज्यूनियर चॅम्पियन पदवी (तिसरे जागतिक विजेतेपद), दिव्या भारतातील ज्युनियर नंबर १ पासून वर्ल्ड ज्युनियर नंबर १ अशा रँकवर पोहोचली असून सध्या ती या रँकवर कायम आहे. 

पुढे काय? आता कोण शिकार?

कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकून जु वेनजुन (चीन) या सध्याच्या वर्ल्ड वुमेन्स चॅम्पियनला आव्हान देणार

आईचा त्याग : दिव्याच्या या यशामध्ये आई डॉ. नम्रता यांचे मोठे योगदान आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळणाऱ्या दिव्यासाठी त्यांनी काम सोडले आणि आपला पूर्ण वेळ दिव्यासाठी दिला. विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर दिव्याने आपल्या आईला मिठी मारली. भावनिक झालेल्या दिव्याला आईने आधार दिला. स्वत:ला सावरून दिव्याने मुलाखत दिली. 

युवा दिव्या देशमुख हिचा अभिमान आहे. उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन! तिच्या या यशामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल. हम्पीनेही शानदार कौशल्य दाखवले.  - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

दिव्याने अजिंक्यपद स्पर्धेत बाजी मारली ही नागपूर आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही तिचा सन्मान करू.  - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

भारताची जागतिक बुद्धिबळातील ताकद

विद्यमान विश्वविजेता : डी. गुकेशऑलिम्पियाड विजेता (खुला गट) : भारतऑलिम्पियाड विजेता (महिला गट) : भारतमहिला विश्वचषक : दिव्या देशमुखमहिला जागतिक रॅपिड विजेती : कोनेरू हम्पी

यशाचा ‘दिव्या’लेख

२०१० : वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात२०१२ : पुडुचेरी येथे अंडर ७ गटात पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक२०१३ : इराणमध्ये आशियाई स्पर्धेत अंडर ८ गटात विजेतेपद२०१३ : सर्वात कमी वयाची वुमन फिडे मास्टर बनली२०१४ : दक्षिण आफ्रिकेत डर्बन येथे अंडर १० गटात वर्ल्ड चॅम्पियन. (आतापर्यंत या स्पर्धेत दिव्याने भारताचे ४० वेळा प्रतिनिधित्व केले असून, २३ सुवर्ण, ७ रौप्य, ५ कांस्य अशी ३५ पदके जिंकली.)२०२० : फिडेद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या विजयी संघात सहभागी२०२३ : इंटरनॅशनल मास्टर पदवी प्राप्त२०२५ : १९ व्या वर्षी भारताची ८८वी ग्रँडमास्टर; कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली, वैशाली रमेशबाबू यांच्यानंतर भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर.

 

टॅग्स :Chessबुद्धीबळnagpurनागपूर