शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2023 : १८ वर्षीय ईशाची कमाल! नेमबाजीत देशाला ११ वे पदक; भारताच्या लेकीचा अचूक निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 12:47 IST

आजही भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवत पदकांना गवसणी घातली.

चीनमध्ये होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय शिलेदारांची चमकदार कामगिरी सुरूच आहे. आजही भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवत पदकांना गवसणी घातली. आज चौथ्या दिवशी ईशा सिंगने नेमबाजीत रौप्य पदक जिंकले. तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत ३४ गुण मिळवले आणि रौप्य पदकावर नाव कोरले. चीनच्या लिऊ रुईने ३८ गुणांसह सुवर्ण पदक जिंकले. तर कोरियाच्या जिनला २६ गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. खरं तर या पदकासह भारताने नेमबाजीत आतापर्यंत एकूण ११ पदके जिंकली. 

सांघिक खेळीच्या जोरावर 'सुवर्ण' कामगिरी ईशा सिंगला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले असले तरी भारताच्या लेकींनी २५ मीटर सांघिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. मनु भाकर, रिदम सांगवान आणि ईशा सिंग यांनी सांघिक खेळी करत २५ मीटर सांघिक प्रकारात १७२९ चा स्‍कोर करत सुवर्ण पदक जिंकले. या स्पर्धेत चीन १७२७ च्या स्‍कोरसह साथ दुसऱ्या स्थानावर राहिला असून कोरियाला १७१२ स्‍कोरसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. 

दरम्यान, आशियाई स्पर्धेत भारतीय शिलेदारांचा सुपर शो सुरूच आहे. भारताने पहिल्या तीन दिवसांत सुवर्ण पदकांसह १५ पदके जिंकली आहेत. आज चौथ्या दिवशी देखील चीनच्या धरतीवर तिरंगा डौलाने फडकत आहे. भारताने नेमबाजीत आतापर्यंत ११ पदके जिंकली आहेत. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३SilverचांदीIndiaभारतShootingगोळीबार