ऑलिम्पिक कांस्यपदक विजेतीवर १६ महिन्यांची बंदी
By Admin | Updated: May 14, 2014 01:03 IST2014-05-14T01:03:59+5:302014-05-14T01:03:59+5:30
लंडन: लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी महिला जलतरणपटू यूलिया एफिमोवावर डोपिंगमध्ये दोषी आढळून आल्याने १६ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे़

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेतीवर १६ महिन्यांची बंदी
ल डन: लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी महिला जलतरणपटू यूलिया एफिमोवावर डोपिंगमध्ये दोषी आढळून आल्याने १६ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे़जलतरणाची आंतरराष्ट्रीय संस्था फीनाने ही माहिती दिली़ ब्रेस्टस्ट्रोक स्पेशालिस्ट २२ वर्षीय एफिमोवाला गत ऑक्टोबरमध्ये झालेल्या स्पर्धेदरम्यान लॉस एंजिलिसमध्ये घेण्यात आलेल्या नमुना एनाबोलिक स्टेरायड-७ कीटो डीएचईएमध्ये पॉझिटिव्ह आढळून आली होती़ या स्टेरायडचे वापर मेटाबालिज्मची प्रक्रिया गतिशील करणे आणि वजन कमी करण्यासाठी वापर केला जातो़ एफिमोवाने विश्व चॅम्पियनमध्ये लांब अंतराच्या स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदक जिंकले आहेत आणि ती ५० मी़ आणि २०० मी़ ब्रेस्टस्ट्रोकमध्ये विश्वविक्रमधारी आहे़ फीनाने म्हटले आहे की, फीनाच्या नियमानुसार एफिमोवावर १६ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे आणि ही बंदी ३१ ऑक्टोबर २०१३ पासून लागू होऊन २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत राहील़ (वृत्तसंस्था)