संजीताला सरकारकडून 15 लाखांचे बक्षीस
By Admin | Updated: July 25, 2014 23:05 IST2014-07-25T23:05:30+5:302014-07-25T23:05:30+5:30
ग्लास्गोमध्ये सुरू असलेल्या 20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये देशाकडून पहिले सुवर्णपदक जिंकून देणारी मणिपूरची खुमुकचाम संजीताला सरकारने 15 लाख रुपयांचे बक्षीस देणार आह़े

संजीताला सरकारकडून 15 लाखांचे बक्षीस
इंफाळ: ग्लास्गोमध्ये सुरू असलेल्या 20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये देशाकडून पहिले सुवर्णपदक जिंकून देणारी मणिपूरची खुमुकचाम संजीताला सरकारने 15 लाख रुपयांचे बक्षीस देणार आह़े मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली़ संजीताने भारोत्ताेलनाच्या 48 किलो वजनीगटात सुवर्ण, मणिपूरच्याच सेखोम मीराबाई चानूने याच गटात द्वितीय तर अॅथलिट 24 वर्षीय कल्पना थोडमने ज्यूडोच्या 52 किलो वजनीगटात कांस्य पटकावल़े तसेच अनुक्रमे द्वितीय, व तृतीय क्रमांकासाठी 1क् व 5 लाखांचे बक्षीस जाहीर झाल़े