सनरायझर्स हैदराबादचं कोलकाता नाईट रायडर्ससमोर 143 धावांचं आव्हान
By Admin | Updated: April 16, 2016 17:43 IST2016-04-16T17:43:08+5:302016-04-16T17:43:08+5:30
सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 143 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सनरायझर्स हैदराबादने 7 विकेट्स गमावत 142 धावा केल्या आहेत

सनरायझर्स हैदराबादचं कोलकाता नाईट रायडर्ससमोर 143 धावांचं आव्हान
>ऑनलाइन लोकमत -
हैदराबाद, दि. १६ - सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 143 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सनरायझर्स हैदराबादने 7 विकेट्स गमावत 142 धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण सुरुवातीलाच शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर स्वस्तात बाद झाले. इऑन मॉर्गनने सर्वात जास्त 51 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून उमेश यादवने 3 विकेट्स घेतल्या तर मॉर्ने मॉर्केलने 35 धावा देत 2 विकेट्स पटकावल्या.
हैदराबादला नवव्या सत्रातही सुरुवातीला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. पण कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज शनिवारी नशीब पालटण्याची चांगली संधी त्यांच्याकडे आहे. सनराइजर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पहिला सामना ४५ धावांनी गमविला. केकेआरचे दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला नऊ गड्यांनी धूळ चारणारा हा संघ दुसऱ्या सामन्यात मात्र मुंबईकडून सहा गड्यांनी पराभूत झाला.
आजच्या या सामन्यात एकीकडे कोलकाता आपली विजयी मालिका पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे हैदराबाद आपला पहिला विजय नोंदवण्यासाठी कोलकाताला पराभवाची धूळ चारण्यासाठी मैदानात उतरेल.