१४० वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश, सिडनी टी-20 सामन्यात भारताचा ७ गडी राखून विजय
By Admin | Updated: January 31, 2016 19:48 IST2016-01-31T17:41:34+5:302016-01-31T19:48:49+5:30
तिस-या व शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून ही मालिका ३-० अशी जिंकली. असून भारतीय संघाने १४० वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम केला आहे.

१४० वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश, सिडनी टी-20 सामन्यात भारताचा ७ गडी राखून विजय
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. ३१ - तिस-या व शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून ही मालिका ३-० अशी जिंकली. असून भारतीय संघाने १४० वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम केला आहे.
रोहित शर्मा (५२), विराट कोहली (५०), सुरेश रैना नाबाद ४९ यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने वॉटसनच्या नाबाद १२४ धावांच्या शानदार खेळीमुळे तिस-या टी - २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने सुरवातीपासुनच कांगारुच्या गोलंदाजावर हल्लाबोल केला. शिखर धवनने ९ चेंडूत एक षटकार आणि आणि ४ चौकाराच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले. रोहित आणि शिखर यांनी पहिल्या विकेटसाठी ३.२ षटकात ४६ धावांची सलामी दिली. धवन बाद झाल्यांतर रोहित शर्माने विराटच्या साथीने धावसंख्या हलती ठेवली रोहित-विराट जोडीने दमदार फलंदाजी करत दुसऱ्या विकेट साठी ७८ धावांची भागीदारी केली. रोहितने ३८ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकाऱ्याच्या मदतीने ५२ धावा केल्या. विराट कोहलीने ३८ चेंडूत ५० भावांचे योगदान दिले. तर सुरेश रैनाने ३० चेंडूत झटपट ४९ धावा केल्या. शेवटच्या षटकात १७ धावा हव्या असताना युवराजने एक चौकार आणि षटकार लावत विजय समिप आणला तर रैनाने एक चेंडूच २ धावा करायच्या असताना खनखनीत चौकार लावत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियातर्फे कॅमेरून बायसने २ तर कर्णधार शेन वॉटसनने १ बळी टिपला.
तत्पूर्वी, वॉटसनच्या नाबाद १२४ धावांच्या शानदार खेळीमुळे तिस-या टी - २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवले. वॉटसनची टी-२० सामन्यातील ही पहिलीच सेंच्युरी.. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ गडी गमावून १९७ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली मात्र ख्वाजा (१४), शॉन मार्श (९) आणि मॅक्सवेल (३) पटापट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती बिकट झाली. पण शेन वॉटसनने एका हाती डाव सावरत शानदार शतक तर झळकावलेच पण ऑस्ट्रेलियाला १९८ धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर हेड २६ आणि ल्यान १३ धावांवर बाद झाले. भारतातर्फे नेहरा, अश्विन, युवराज, भुमरा आणि जडेजाने प्रत्येकी १ बळी टिपला.
तीन सामन्यांची मालिका भारताने आधीच २-० अशी जिकंली असून आजचा सामनाही जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा धोनी व संघाचा इरादा आहे.
विराट कोहलीला मालिकावीर तर शेन वॉटसन सामनावीर पुरस्कार देण्यात आला,भारतार्फे आज रोहित शर्माने टी२० मध्ये १००० धावांचा टप्पा पार केला.