12 साल बाद.. भारत अंतिम फेरीत
By Admin | Updated: October 1, 2014 02:00 IST2014-10-01T02:00:52+5:302014-10-01T02:00:52+5:30
भारताने मंगळवारी सियोनहॅक हॉकी स्टेडियममध्ये यजमान कोरियाचा 1-क् ने पराभव केला आणि 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आशियाई स्पर्धेत पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

12 साल बाद.. भारत अंतिम फेरीत
पाकविरुद्ध सुवर्णपदकासाठी झुंज : कोरीयाचा 1-क् ने पराभव
इंचियोन : आकाशदीप सिंगच्या शानदार मैदानी गोलच्या जोरावर भारताने मंगळवारी सियोनहॅक हॉकी स्टेडियममध्ये यजमान कोरियाचा 1-क् ने पराभव केला आणि 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आशियाई स्पर्धेत पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघांदरम्यान सुवर्णपदकासाठी झुंज रंगणार आहे.
भारताने पहिल्या दोन क्वॉर्टरमध्ये गोल करण्याच्या तीन नामी संधी गमावल्यानंतर आकाशदीपने 44 व्या मिनिटाला गोल नोंदवीत संघाला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली. अखेर आकाशदीपने नोंदविलेला गोल निर्णायक ठरला.
यापूर्वी 2क्क्2 च्या बुसान आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविणा:या भारतीय पुरुष हॉकी संघाला फायनलमध्ये गुरुवारी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पाकिस्तानने आज दुस:या उपांत्य लढतीत 2क्1क् ग्वांग्झू आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मलेशियाचा शूटऑफमध्ये 6-5 ने पराभव केला. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संघाला 2क्16 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. साखळी फेरीत पाकविरुद्ध 1-2 ने पराभव स्वीकारणा:या भारतीय संघाला अंतिम फेरीत या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळणार आहे.
आशियाई स्पर्धेत कोरियाविरुद्धच्या 14 सामन्यांतील भारताचा हा आठवा विजय आहे. कोरियाविरुद्ध आजतागायत खेळल्या गेलेल्या एकूण 72 सामन्यांपैकी भारताचा हा 29 वा विजय आहे. आज खेळल्या गेलेल्या लढतीत भारताने सुरुवातीपासून वर्चस्व गाजविले. कोरिया संघाला भारताचा बचाव भेदण्यात अपयश आले. भारतीय संघाने सातत्याने कोरियाच्या गोलक्षेत्रत मुसंडी मारली तर प्रतिस्पर्धी संघ त्यात अपयशी ठरला.
दुस:या क्वॉर्टरच्या तिस:या मिनिटाला भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण प्रतिस्पर्धी संघाचा गोलकीपर ली याने व्ही. रघुनाथचे प्रयत्न हाणून पाडले. रमणदीप सिंग व गुरविंदरसिंग चांडी यांची कामगिरी निराशाजनक ठरली. पण वीरेंद्र लाक्रा, रघुनाथ, मनप्रीत सिंग व रूपिंदरपाल सिंग यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. गुरुबाजाने चमकदार कामगिरी केली. त्याला सुनीलने योग्य साथ दिली. आकाशदीपने 44 व्या मिनिटाला अप्रतिम गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. पिछाडीवर पडलेल्या कोरियन संघाने अखेरच्या क्वॉर्टरमध्ये आक्रमक खेळ केला. पण भारताचा बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले. सामना संपायला दोन मिनिटांचा अवधी शिल्लक असताना कोरियाला पहिला व एकमेव पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण भारताने उत्कृष्ट बचाव करीत त्यांचे बरोबरी साधण्याचे प्रयत्न हाणून पाडले. (वृत्तसंस्था)