‘झी’चे पत्रकार स्वानंद कुलकर्णी यांचे निधन
By Admin | Updated: November 11, 2014 01:45 IST2014-11-11T01:45:40+5:302014-11-11T01:45:40+5:30
झी 24 तास या वृत्तवाहिनीमध्ये कार्यरत असलेले पत्रकार स्वानंद कुलकर्णी यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

‘झी’चे पत्रकार स्वानंद कुलकर्णी यांचे निधन
डोंबिवली : झी 24 तास या वृत्तवाहिनीमध्ये कार्यरत असलेले पत्रकार स्वानंद कुलकर्णी यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 33 वर्षाचे होते. डोंबिवली येथील नांदिवली परिसरात राहत होते. सकाळी 9.3क् वाजता जीममध्ये व्यायाम करीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. स्वानंदच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.
रात्री 1क् च्या सुमारास स्वानंदच्या पार्थिवावर डोंबिवलीतील शिवमंदिर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पत्रकारिता, नाटय़ आणि संगीत क्षेत्रतील मित्र परिवाराच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.
एबीपी माझा, साम, टीव्ही 9 आणि त्यानंतर आता झी 24 तास अशा विविध वृत्तवाहिन्यांमध्ये
काम केलेल्या स्वानंदची
जीवनातून अकस्मात झालेली एक्ङिाट सर्वाना चटका लावून गेली आहे. त्यांच्या निधनाबद्दल दु:ख
व्यक्त करण्यात येत आहे.
(प्रतिनिधी)