डंपरच्या धडकेत तरूणाचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल
By नामदेव मोरे | Updated: March 15, 2023 18:16 IST2023-03-15T18:15:22+5:302023-03-15T18:16:07+5:30
गव्हाण फाटा ते सीबीडीकडे जाणाऱ्या पूलावर मंगळवारी रात्री अपघात झाला.

डंपरच्या धडकेत तरूणाचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल
नवी मुंबई : गव्हाण फाटा ते सीबीडीकडे जाणाऱ्या पूलावर मंगळवारी रात्री अपघात झाला. डंपरने स्कुटीला धडक दिल्यामुळे स्कुटीवरील भावेश ठाकूर या तरूणाचा मृत्यू झाला आहे.
भांडूप येथे राहणारा भावेश ठाकूर कामानिमीत्त पनवेलला आला होता. गव्हाण फाटा ते सीबीडी रोडवरून एमएच ०३ सीएक्स २९७९ या स्कुटीवरून रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास प्रवास करत होता. पुलावर स्कुटीला डंपरने एमएच ४३ बीपी ५९८२ ने स्कुटीला धडक दिली. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या भावेशला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले. तेथे उपचार पोहचण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
डंपर चालकाने निष्काळजीपणाने वाहन चालविल्यामुळे अपघात झाला असल्याचा ठपका ठेवून चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.