शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

अवकाश संशोधन परिषदेला जाणार गडबचा तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 23:59 IST

गरिबांना मनोरंजन महाग केल्याची टीका

- प्रदीप मोकल

नासा, जपान, रशिया, इस्रो, चायना, युरोपियन देशांशी संलग्न असणाऱ्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅरानॅटिक काँग्रेस (आय.ए.सी.) म्हणजेच अमेरिकेत होणाºया आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी पेण तालुक्यातील गडब येथील प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे याची निवड झाली आहे. १९५१ साली स्थापन झालेल्या या संस्थेची ७० वी परिषद असून, आजपर्यंत एकाही भारतीय व्यक्तीची अथवा संस्थेची निवड या परिषदेसाठी झालेली नव्हती. मात्र, आॅक्टोबर २०१९ मध्ये होणाºया परिषदेमध्ये सादरीकरण करण्यासाठी ८६ देशांमधून ४३२० शोधनिबंधामधून भारतातील विशेष करून महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सात, तर कल्याणमधील एका विद्यार्थ्याची या परिषदेसाठी पहिल्यादा निवड झाली .

पहिला शोधनिबंध कशावर होता?पहिल्या शोधनिबंधामध्ये पृथ्वी बाहेर मानवी वसाहत राहू शकेल, अशा ग्रहाच्या शोधमोहिमेतील टायटन या शनीच्या ५२ व्या चंद्राच्या पृष्ठभागावरील बदलाचा अभ्यास केला जाणार आहे.

दुसºया शोधनिबंधातील काही ठळक मुद्दे सांगू शकाल?दुसºया शोधनिबंधामध्ये पृथ्वी व मंगळासहित इतर ग्रहांच्या प्रदूषित वातावरणाचे पृथ्थकरण करून त्यात मानवी शरीर कसे टिकवयाचे याचा समावेश आहे. हे दोन्ही शोधनिबंध इप्पेरियल सायंटिफिक असोसिएशनतर्फे सादर करण्यात येणार आहेत. हे संशोधनीय निबंध २१ ते २६ आॅक्टोबर दरम्यान अमेरिकेत वॉशिग्टंन येथे सादर होतील. संशोधन सादर करण्यासाठी प्रत्येकाला दहा मिनिटांचा वेळ दिला जाईल. हे सादरीकरण मी स्वत: करणार आहे.वैज्ञानिक क्षेत्रातील आवड असणाºयासाठी व्यासपीठ निर्माण व्हावे, यासाठी इप्पेरियल सायंटिफिक असोसिएशनची स्थापना सायस्टिस्ट अस्टॉनॉट कॅडिडेट नासा, प्रणित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडसह महाराष्ट्रातील तरुणांनी एकत्र येत केली. ही संस्था रायगडसह महाराष्ट्रात काम करीत आहे.दोन प्रबंध सादरीकरणाची मिळाली संधीजिल्ह्यातील शाळा कॉलेजमधून रॉकेट तंत्रज्ञान, अवकाश दर्शन, स्पेस कॅम्प असे अवकाश तंत्रज्ञान संबंधित विविध क्षेत्रातील सेमिनार स्वखर्चाने करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातूनच हे प्रबंध अमेरिकेत होणाºया जागतिक परिषदेसाठी सादर करण्यात आले. त्यातील दोन प्रबंधाचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली असून, त्या ठिकाणी या प्रबंधाचे सादरीकरण करणार आहे.विविध क्षेत्रांमध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. मात्र, मी निवडलेले क्षेत्र हे वेगळे आहे, येथे आम्हालाच संधी निर्माण करावी लागते. मला माझ्या आईवडिलांकडून चांगले काम करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन मिळते, त्यांच्यामुळेच हे यश माझ्या पदरात पडले आहे. - प्रज्ञेश म्हात्रे