मुख्याध्यापकांसाठी आॅनलाइन सरळ डाटा भरण्यासंबंधी कार्यशाळा
By Admin | Updated: October 8, 2015 23:36 IST2015-10-08T23:36:48+5:302015-10-08T23:36:48+5:30
सरल डेटा प्रणालीनुसार कामकाजासंदर्भात ज्ञानविकास संस्थेच्या डी.व्ही.एस इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवारी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या

मुख्याध्यापकांसाठी आॅनलाइन सरळ डाटा भरण्यासंबंधी कार्यशाळा
नवी मुंबई : सरल डेटा प्रणालीनुसार कामकाजासंदर्भात ज्ञानविकास संस्थेच्या डी.व्ही.एस इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवारी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कोपरखैरणे-३१ आणि कोपरखैरणे-३८ या केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांना सरळ प्रणालीमध्ये डाटा कसा भरावा, याचे आॅनलाइन प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व मुख्याध्यापकांच्या शंकांचे निरसन करुन डाटा भरण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून आॅनलाइन डाटा भरण्यासंदर्भात वाटणाऱ्या अडचणी अगदी सहजतेने सोडविण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेच्या माध्यमातून समजण्यास अवघड वाटणारी ही सरळ डाटा प्रणाली अगदी सहजपणे अवगत करता आली अशी प्रतिक्रिया उपस्थित मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. या कार्यशाळेत समन्वयक जयमाला पाटील, भिकाजी सावंत उपस्थित होते. या आॅनलाइन प्रशिक्षणामुळे सरळ डाटा प्रणालीनुसार कसे काम करावे याचे प्रात्यक्षिक दाखविल्याने अनेक शंकांचे निरसन झाले अशी प्रतिक्रिया डी.व्ही.एस. शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा पाटील यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)