इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू
By Admin | Updated: November 27, 2014 00:31 IST2014-11-27T00:31:59+5:302014-11-27T00:31:59+5:30
इमारतीचे काम करताना 13व्या मजल्यावरून कोसळून रंजित पाल नामक कामगार जागच्या जागी ठार झाला आहे.

इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू
उरण : उरणच्या बोकडविरा येथील द्रोणगिरी सेक्टर 46 च्या प्लॅाट क्रमांक 42वर चालू असलेल्या इमारतीचे काम करताना 13व्या मजल्यावरून कोसळून रंजित पाल नामक कामगार जागच्या जागी ठार झाला आहे. वाशीच्या अक्षर बिल्डर्सच्या माध्यमाने या इमारतीचे काम चालू असून त्यावर कामगार पुरविण्याचे काम स्वस्तिक बिलकॉन कंन्स्ट्रक्शन ला देण्यात आले होते अशी माहिती त्या इमारतीवर काम करणा:या इतर कामगारांकडून देण्यात आली आहे.
कामगाराला काम करीत असताना सुरक्षेची कोणतीही साधने पुरविण्यात आली नव्हती. या भागात निर्माण होणा:या नवनवीन इमारतींच्या प्लंबिंगचे काम करणा:या रोजंदारी कामागारांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. उरण तालुक्याच्या द्रोणागिरी विभागात गेल्या काही महिन्यांपासून सिडकोच्या प्लॉटींगवर वाशी, नवी मुंबईसह पुण्यातल्या मोठया विकासकांकडून इमारती उभारण्याचे काम चालू आहे.
सुमारे 13 मजल्यांपेक्षा जास्त उंच इमारत अक्ष्र बिल्डरच्या वतीने बोकडविरा गावाच्या दक्षिणोला बांधण्यात येत आहे. अशा इमारतीचे काम करीत असताना आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास रंजित पाल, 27 या कामागाराचा शिडी घरसल्याने उंचावरून खाली पडल्याने जागच्या जागी मृत्यू झाला आहे. उरण पोलिस ठाण्यात या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
च्कामगाराला काम करीत असताना सुरक्षेची कोणतीही साधने पुरविण्यात आली नव्हती.
च्रंजित पाल ‘द्रोणगिरी’ इमारतीच्या 13व्या मजल्यावर काम करत होता.
च्या बांधकामासाठी कामगार पुरविण्याचे कंत्रट स्वस्तिक ‘बिलकॉन कंन्स्ट्रक्शन’कडे आहे.