शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

श्रमिक साहित्य संमेलनात कष्टकऱ्यांच्या कलेचा जागर 

By नामदेव मोरे | Published: April 30, 2024 8:36 PM

युवा सामाजिक संस्थेचे आयोजन; बांधकाम मजूर,  फेरीवाले घरेलू कामगारांचा सहभाग. 

नवी मुंबई: कष्टकरी असंघटित कामगारांना त्यांच्यातील कला व साहित्यिक गुणांना व्यासपिठ मिळवून देण्यासाठी खारघरमधील युवा सामाजिक संस्थेने दुस-या श्रमीक सांस्कृतिक साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यामध्ये बांधकाम मजूर,  फेरीवाले , घरेलू कामगारांनी त्यांच्यातील कलेचा जागर केला. हक्कांसाठी संघटीत होवून लढा देण्याचा संकल्प  केला. 

खारघर सेक्टर ७ मधील युवा सेंटर मध्ये कामगार दिनाच्या पाश्र्वभूमीवर हे संमेलन आयोजित केले होते. दिवसभर चार सत्रात झालेल्या संमेलनात सहभागी कलाकार व कष्टकरी कामगारांनी चळवळीती गाणी सादर केली. कामगार दिनाचे महत्व,  मुंबईतील गिरणी कामगारांचा सर्वात मोठा संप, कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे,  अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती फलकांच्या माध्यमातून ओळख करून देण्यात आली. अनेक नामांकित कलाकारांनी गोंधळ, वासुदेव व इतर पारंपरिक लोकगिते सादर केली. पोवाडे, कविता सादर केल्या.  कामगारांनीही खड्या आवाजात कविता व चळवळीतील गितांचे सादरीकरण केले.

शाहीर संभाजी भगत यांनी सादर केलेल्या हिटलर के साथी ला कष्टक-यांनीच दाद दिली. असंघटित कामगारांनी संघटीत होऊन लढा देण्याचे आवाहन केले. घर हक्क समितीचे हिरामन पगार यांनी युवा संस्थेने कष्टक-यांचे जीवन सुरक्षित करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. प्रयास चे आशिष शिगवन यांनीही मार्गदर्शन केले, अप्पासाहेब उगले, रामानंद उगले व सहका-यांनी लोकला सादर केल्या. कामगारांनी त्यांच्या कलेचे सादरीकरण केले व लेझीम च्या तालावर फेर धरला. युवा संस्था ४० वर्षांपासून कष्टकरी बांधकाम मजूर, घरकाम कामगार व फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर काम करत आहे. दोन वर्षांपासून श्रमीक सांस्कृतिक साहित्य संमेलन सुरू केले असून दुस-या वर्षीही उत्तम प्रतिसाद मिळाला.ॲड.सुजीत निकाळजे,  युवा संस्था   कामगारांना हक्काचे व्यासपीठ कामगार दिनाच्या एक दिवस अगोदर आयोजित या संमेलनात कष्टकरी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिला कामगारांची उपस्थिती उल्लेखनीय होती. युवा संस्थेने व्यासपिठ मिळवून दिल्याबद्दल सर्वांनी ॠण व्यक्त केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई