गुन्हे शाखेत कार्यरत महिला पोलीस बेपत्ता

By Admin | Updated: March 27, 2017 06:31 IST2017-03-27T06:31:05+5:302017-03-27T06:31:05+5:30

गुन्हे शाखेत कार्यरत असलेली महिला पोलीस दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचा प्रकार घडला आहे

Women police missing from crime branch | गुन्हे शाखेत कार्यरत महिला पोलीस बेपत्ता

गुन्हे शाखेत कार्यरत महिला पोलीस बेपत्ता

नवी मुंबई : गुन्हे शाखेत कार्यरत असलेली महिला पोलीस दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचा प्रकार घडला आहे. घणसोली येथे ती पतीसह राहायला होती. २४ मार्चला कामावरून ती घरी परत न आल्यामुळे तिच्या बेपत्ता होण्याची तक्र ार दाखल करण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात काम करणारी महिला पोलीस बेपत्ता होण्याची घटना दुसऱ्यांदा घडली आहे. यापूर्वी एक महिला पोलीस वाशी खाडी पुलावरून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेली असून तिच्याविषयी अद्याप पोलिसांना तपास लागलेला नाही.
बेपत्ता महिला पोलीस विवाहित असून त्यांच्या लग्नाला सहा वर्षे झालेली आहेत. शुक्रवारी त्या नेहमीप्रमाणे कामाला गेल्यानंतर रात्री घरी आल्या नाहीत. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार कोपरखैरणे पोलिसांकडे केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Women police missing from crime branch