शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
3
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
4
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
6
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
7
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
8
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
9
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
10
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
11
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
12
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
13
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
14
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
15
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
16
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
17
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
18
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
19
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
20
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार

लेडीज बार विरोधात महिला आक्रमक

By admin | Updated: December 7, 2015 01:21 IST

तुर्भे एपीएमसी परिसरात रहिवाशी वस्ती व उर्दु शाळेच्या समोर लेडीज बार सुरू करण्यात आला आहे. याविशयी रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे

नवी मुंबई : तुर्भे एपीएमसी परिसरात रहिवाशी वस्ती व उर्दु शाळेच्या समोर लेडीज बार सुरू करण्यात आला आहे. याविशयी रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बारबंद करण्यासाठी महिलांनी सह्यांची मोहीम राबविली असून महापालिका व पोलिस आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर डॉस बार पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे यापुर्वी बंद झालेले बारही सुरू होवू लागले आहेत. एपीएमसीजवळ राम लक्ष्मण टॉवर समोर यापुर्वी बाबा पॅलेस हा सर्वीस बार होता. काही दिवसापुर्वी येथील अशोका काँम्लेक्समध्ये लाईट नाईट नावाचा नवीन बार सुरू झाला आहे. माथाडी कामगार व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या ए २ टाईप चाळीच्या गेटसमोरच हा बार आहे. बारच्या बाजूला असणाऱ्या मेडीकलमध्ये व किराणा दुकानांमध्ये रहिवाशांना नियमीत यावे लागत आहे. लेडीज बार सुरू झाल्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महिलांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. नवीन बारच्या समोरच उर्दु माध्यमाची शाळा आहे. शाळेच्या समोरच बारचा बोर्ड दिसत आहे. शाळेच्या जवळ अशा बारला परवानगी नको अशी भुमीका रहिवाशांनी घेतली आहे. यापुर्वी राम रक्ष्मण टॉवरसमोर बाबा पॅलेस हाही सर्वीस बारअसून त्याविषयी यापुर्वीच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवाय याच ठिकाणी दारूविक्रीचे दुकान आहे. रात्री अनेक वेळा दुकानासमोरच काहीजण दारू पित असल्याचे चित्र दिसत असते. तुर्भे परिसरातील लेडीज सर्वीस बार बंद करण्यात यावा यासाठी संकल्प सामाजीक संस्थेने सह्यांची मोहीम राबविली आहे. ए २ टाईप वसाहतीमधील ५७० सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहसचीव, महापालिका व पोलिस आयुक्त यांना देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी याविषयी माहीती देताना सांगितले की रहिवाशी वसाहतीजवळ व शाळेच्या समोर लेडीज बारला परवानगी दिल्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासनाने तत्काळ सर्वीस बार बंद केला नाही तर महिला तिव्र आंदोलन करणार आहेत.