महिलेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

By Admin | Updated: May 31, 2017 03:43 IST2017-05-31T03:43:02+5:302017-05-31T03:43:02+5:30

पेण तालुक्यातील निगडे गावातील ऊर्मिला नाईक यांचे घर क्रमांक ६३४ हे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनात

The woman's District Collector stays in front of the office | महिलेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

महिलेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : पेण तालुक्यातील निगडे गावातील ऊर्मिला नाईक यांचे घर क्रमांक ६३४ हे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनात येत नसतानाही गेली सहा वर्षे त्यांच्या घरावर नाहक भूसंपादनाबाबतचे मार्किंग केले जात होते. याबाबत ऊर्मिला पाटील यांनी पेणच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्र ार केली होती. असे असतानादेखील प्रशासनाने या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप ऊर्मिला पाटील यांनी केला. याप्रश्नी न्याय मिळावा यासाठी तिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.

अधिकारी फिरकलेच नाहीत

घर संपादनात जात असेल तर मला आर्थिक मोबदला मिळालाच पाहिजे अशी भूमिका या महिलेने घेतली आहे. मात्र ठिय्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कोणताच अधिकारी न फिरकल्याने ती महिला हताश झाली आहे. याआधीही त्या महिलेने प्रशासनाला सुमारे चार वेळा जागे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रशासनाच्या फसव्या आश्वासनामुळे तिचे आंदोलन चिरडले गेले होते.

Web Title: The woman's District Collector stays in front of the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.