कामगार रुग्णालयाच्या इमारतीमध्ये महिलेचा खून
By Admin | Updated: December 12, 2014 02:11 IST2014-12-12T02:11:41+5:302014-12-12T02:11:41+5:30
कामगार रुग्णालय वसाहतीमधील इमारत क्र. 13 च्या तिस:या मजल्यावर एका महिलेचा खून झाल्याप्रकरणी दीपक पांडे (24) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे.

कामगार रुग्णालयाच्या इमारतीमध्ये महिलेचा खून
ठाणो : कामगार रुग्णालय वसाहतीमधील इमारत क्र. 13 च्या तिस:या मजल्यावर एका महिलेचा खून झाल्याप्रकरणी दीपक पांडे (24) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. हा खून केल्यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. खून कोणत्या कारणासाठी केला, याची मात्र तो वेगवेगळी उत्तरे देत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इमारत क्र. 13 च्या तिस:या मजल्यावर 6क् ते 65 वर्षीय महिलेचा खून करण्यात आल्याचे 9 डिसेंबर रोजी पोलिसांना रहिवाशांनी सांगितले. तिच्या कपाळावर काँक्रीटच्या दगडाने मारहाण केल्याच्या खुणाही आढल्या. आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी हॉलच्या खिडकीतून तिला खाली फेकून देण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्ञानेश्वरनगरातील पांडे या महिलेसोबत तिस:या मजल्यावर गेल्याचे अनेकांनी पाहिले होते. त्यानुसार त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला ‘बोलते’ केल्यानंतर त्याने या खुनाची कबुली दिली. त्यानंतर त्याला 11 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. ही महिला कोण आणि त्याने तिचा खून का केला, याचा उलगडा मात्र झाला नसल्याचे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.(प्रतिनिधी)