महिलेने थांबवली लोकल
By Admin | Updated: December 24, 2016 03:30 IST2016-12-24T03:30:53+5:302016-12-24T03:30:53+5:30
एका मनोरुग्ण महिलेने हार्बर मार्गावरील ट्रेन थांबविल्याची घटना शुक्रवारी २३ डिसेंबरला मानसरोवर रेल्वे स्थानकावर घडली.

महिलेने थांबवली लोकल
पनवेल : एका मनोरुग्ण महिलेने हार्बर मार्गावरील ट्रेन थांबविल्याची घटना शुक्रवारी २३ डिसेंबरला मानसरोवर रेल्वे स्थानकावर घडली. पनवेलहून सीएसटीकडे जाणारी सकाळी ९.३० ची गाडी कामोठे रेल्वे स्थानकावर आली असताना ही घटना घडली.
कामोठेमध्ये राहणारी ३५ वर्षीय महिला मानसरोवर रेल्वे स्थानकातील फलाटावर उभी असताना तिला चक्कर आल्याने फलाटाखाली रेल्वे रुळावर पडली. या दरम्यान अनेकांनी या महिलेला हात देऊन वर येण्यास सांगितले, मात्र महिला वर येत नव्हती. गाडी सुटण्याची वेळ झाली तरी सुद्धा ही महिला रेल्वे रुळावरच उभी होती. मोटरमनच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी गाडी काही काळ थांबवून ठेवली, त्यानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीने या महिलेला वर काढण्यात आले. (प्रतिनिधी)