ब्रिटिशकालीन जलस्रोत उपयोगाविनाच

By Admin | Updated: April 21, 2016 02:55 IST2016-04-21T02:55:26+5:302016-04-21T02:55:26+5:30

निसर्गाच्या अद्भुत जादूई लीलेने माथेरान येथे जलाशयाचे साठे आजही अनेकदा डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणात आढळतात

Without the use of British water resources | ब्रिटिशकालीन जलस्रोत उपयोगाविनाच

ब्रिटिशकालीन जलस्रोत उपयोगाविनाच

माथेरान : निसर्गाच्या अद्भुत जादूई लीलेने माथेरान येथे जलाशयाचे साठे आजही अनेकदा डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीपासून जवळपास २,६०० फुटांवर वसलेल्या माथेरानमधील अनेक भागांत असे नैसर्गिक जलस्रोत आहेत. त्याचा प्रशासनाकडून सदुपयोग केला जात नसल्याने एप्रिल-मे या शेवटच्या व्यावसायिक हंगामात पाण्याच्या अत्यल्प पुरवठ्यामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे.
येथील दस्तुरी नाका परिसरातील घनदाट जंगलात वनउद्यांना शेजारीच ब्रिटिशकालीन सिम्पसन टँक हा ४० फूट खोल असलेला तीन एकराच्या जागेतील तलाव बाराही महिने पाण्याने भरलेला असतो. परंतु या तलावाचे पाणी सहसा वापरात आणले जात नाही. इक्को पॉइंटजवळ वॉकर टँक या ब्रिटिशकालीन डबकेवजा तलावात झऱ्याच्या स्रोताचा मुबलक पाणीसाठा असतो. श्रीराम मंदिर या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणच्या पश्चिमेला जुनी बोअरवेल असून, यापूर्वी तिचा वापर होत असे. परंतु अनेक वर्षांपासून ही बोअरवेल बंद अवस्थेत आहे. सनसेट पॉइंटजवळ म्यालेट स्प्रिंग हा बाराही महिने जिवंत झरा आयुर्वेदिक पाण्याचा आहे. तर संत रोहिदास नगरच्या पूर्वेस चांभार पाणी या ठिकाणी बाराही महिने झऱ्याचे पाणी वाहत असते. तसेच बाजारातील कमेला येथेही झऱ्याचे पाणी वाहते. त्याचप्रमाणे गळती या कॉटल शेड ठिकाणी पेमास्टर विहीर अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. माथेरानमधील हे सर्वच जलस्रोत नगर परिषद प्रशासनाने उपयोगात आणल्यास पाण्याची कमतरता भासणार नाही, असे येथील नागरिकांचे मत आहे. सध्या माथेरानमध्ये पाणीटंचाई असल्यामुळे हे नैसर्गिक स्रोत उपयोगात आणावे, अशी माथेरानकरांची मागणी असून हे स्रोत उपयोगात आले तर सर्वांनाच दिलासा मिळून पर्यटन व्यवसाय आपोआपच बहरेल, अशी अपेक्षा व्यक्त के ली जात आहे.(वार्ताहर)

Web Title: Without the use of British water resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.