क्रिकेट स्पर्धेत पोलिसांचा संघ विजेता
By Admin | Updated: January 23, 2017 05:50 IST2017-01-23T05:50:46+5:302017-01-23T05:50:46+5:30
पत्रकार दिन आणि रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशझोतातील

क्रिकेट स्पर्धेत पोलिसांचा संघ विजेता
नवी मुंबई : पत्रकार दिन आणि रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेत सलग चौथा वर्षी नवी मुंबई पोलीस संघाने अंजिक्यपद पटकाविले. क्रिकेट फॉर रोड सेफ्टी या उपक्रमांतर्गत शनिवारी नेरु ळ येथी डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या स्पर्धेचे उद्घाटन नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे व सहपोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्पर्धेमध्ये नवी मुंबई पोलीस, आरटीओ, वाहतूक पोलीस शाखा, कोकण परिक्षेत्र पोलीस, नगरसेवक, नवी मुंबई महापालिका, सिडको, कोकण रेल्वे, वकील संघटना, बिल्डर्स असोसिएशन व पत्रकार आदींचे संघ सहभागी झाले होते. प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नवी मुंबई पोलिसांच्या संघाने नवी मुंबई महापालिका संघावर मात करून सलग चौथ्या वर्षी विजेतेपदाचा चषक पटकावला. उपविजेत्या महापालिका संघासह सिडको आणि बिल्डर्स या संघांनाही तृतीय व चतुर्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महापौर सुधाकर सोनावणे नगरसेवकांच्या संघाला प्रोत्साहीत करण्यासाठी आवर्जुन उपस्थित होते. यासंपूर्ण स्पर्धेचे नियोजन क्रिकेट प्रशिक्षक विकास साटम यांनी केले. नवी मुंबई प्रेस क्लबचे पदाधिकारी नारायण जाधव, माच्छिंद्र पाटील, नंदू ठाकूर, विक्रम गायकवाड, मनोज पाठक, स्वाती नाईक आदींनी मेहनत घेतली.