लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून गंभीर पावले उचलली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, ३ नोव्हेंबरला सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीत सिडकोच्या विविध हाउसिंग योजनांतील घरांच्या किमतीत सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची कपात करण्याची शक्यता सूत्राने वर्तवली आहे.
८ महिन्यांपासून ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेंतर्गत लॉटरीद्वारे जाहीर केलेल्या घरांच्या दरांविषयी नाराजी व्यक्त आहे. सोडतधारकांनी परवडत नसलेल्या दरांविरोधात निदर्शने, निवेदने सादर केली होती. या पार्श्वभूमीवर घरांच्या किमतीबाबत पुनर्विचार करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलाविण्यात आली आहे.
सर्वांचे लक्ष निर्णयाकडे
सिडकाेच्या माझ्या पसंतीचे घर या याेजनेंतर्गत घरांच्या किमतीवर ग्रहाकांनी आक्षेप घेतला. याला प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने यावर ताेडगा काढण्यासाठी बैठक घेतली आहे. या बैठकीत किमती कमी करण्याचा निर्णय हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर कपातीचा निर्णय झाल्यास हजारो सोडतधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरेल, अशी राजकीय चर्चा आहे. बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार शशिकांत शिंदे, आमदार विक्रांत पाटील तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित राहणार आहेत.
Web Summary : CIDCO house prices may fall by ₹1.5-2 lakhs following a government meeting. Unhappy with current rates, lottery winners protested. A price reduction could greatly benefit thousands and impact upcoming elections. Key ministers and CIDCO officials will attend the meeting.
Web Summary : शासकीय बैठकीनंतर सिडकोच्या घरांच्या किमतीत ₹1.5-2 लाखांची घट होण्याची शक्यता आहे. विद्यमान दरांवर नाराज सोडत विजेत्यांनी निदर्शने केली. किंमत कपात झाल्यास हजारो लोकांना फायदा होऊ शकतो आणि आगामी निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. बैठकीत मंत्री आणि सिडको अधिकारी उपस्थित राहणार आहेत.