शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

ऐरोली नाट्यगृहाच्या आसनक्षमतेमध्ये होणार वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 02:21 IST

ऐरोलीमधील नाट्यगृहाच्या आसनक्षमतेमध्ये वाढ करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. पूर्वीच्या आराखड्यात ५५० आसनांचा समावेश होता.

नवी मुंबई : ऐरोलीमधील नाट्यगृहाच्या आसनक्षमतेमध्ये वाढ करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. पूर्वीच्या आराखड्यात ५५० आसनांचा समावेश होता. नाट्यकर्मींनी केलेल्या सूचनांनंतर आराखड्यात बदल करण्यात आला असून ८६० आसनांची व्यवस्था केली आहे. लवकरच या कामास सुरुवात केली जाणार आहे.नवी मुंबईमध्ये वाशीत विष्णुदास भावे नाट्यगृह असून मनपा क्षेत्रातील नाट्यरसिकांसाठी हा एकमेव पर्याय आहे. ऐरोली, दिघा परिसरातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वाशीपर्यंत जावे लागत असल्यामुळे ऐरोलीमध्ये नवीन नाट्यगृह उभारण्याची मागणी नागरिकांनी केली होती. महापालिकेने सेक्टर ५ मधील भूखंड क्रमांक ३७ वर नाट्यगृहाचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू केले होते; परंतु विविध कारणांमुळे ते काम रखडले होते. जुन्या आराखड्याप्रमाणे नाट्यगृहामध्ये ३१० आसनांचा समावेश केला होता; परंतु एवढी आसनक्षमता अत्यंत अपुरी असल्याचे नाट्यकर्मींनी सांगितले होते. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, मराठी बाणा फेम अशोक हांडे यांनी आसनक्षमता वाढवून घेण्यासाठी पाठपुरावा केला होता. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठकही झाली होती. आयुक्तांनी नाट्यकर्मींच्या सूचनांचा आदर करून नवीन आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये नाट्यगृहाची आसनक्षमता ८६० करण्यात अली आहे. या कामासाठी महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील दोन महिन्यामध्ये नाट्यगृहाच्या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे. नवीन कामासाठी ६८ कोटी ७६ लाख रुपये खर्च येणार आहे.महानगरपालिकेने नाट्यकर्मींच्या सूचनांचा आदर करून नवीन आराखडा तयार केल्याचा लाभ शहरवासीयांना होणार आहे. कमी आसनक्षमतेसह नाट्यगृहाचे काम झाले असते तर पालिकेचे पैसे व्यर्थ गेले असते. चांगली नाटके व इतर महत्त्वाचे कार्यक्रम या नाट्यगृहात घेता आले नसते. ऐरोलीकरांना व नाट्यकर्मींनाही पुन्हा वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाचा आधार घ्यावा लागला असता.अशी आहे नाट्यगृहाची रचनापहिले व दुसरे तळघर : ९४ वाहनांसाठी पार्किंग ४१ दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोयतळमजला : तिकीट घर, महिला व पुरुष प्रसाधनगृह, रंगीत तालीम कक्ष, मुख्य प्रवेशद्वार, प्रदर्शनीय क्षेत्रपहिला मजला : मेकअप रूम, महिला व पुरुषांसाठी दोन प्रसाधनगृह, अपंगांसाठी प्रसाधनगृह व उपाहारगृहदुसरा मजला : ग्रीन रूम, प्रशासकीय दालन आणि बहुउद्देशीय सभागृहतिसरा मजला : अधिकारी कक्ष, अतिथीगृह व उपाहारगृहचौथा मजला : विशेष अतिथीगृह आणि अधिकारी कक्षवाशीप्रमाणेच ऐरोली परिसरातील नाट्यरसिकांसाठी देखील एखादे नाट्यगृह असावे, ही संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. हा प्रलंबित प्रकल्प मार्गी लावत असताना सुधारित अंदाजपत्रकानुसार ऐरोलीच्या नाट्यगृहाचे काम आता सुरू होणार आहे.- जयवंत सुतार, महापौरनाट्यगृहाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील दीड महिन्यात ती पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, आधुनिक पद्धतीने नाट्यगृह बांधण्यात येणार आहे.- गिरीश गुमास्ते, कार्यकारी अभियंता, महापालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका