युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी वायफाय सेवा
By Admin | Updated: April 22, 2017 02:59 IST2017-04-22T02:59:02+5:302017-04-22T02:59:02+5:30
युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी पनवेल, कळंबोली, परिसरातील उमेदवारांकडून नवनवीन शक्कल लढवण्यात येत आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी कार्यालये थाटून मतदारांना

युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी वायफाय सेवा
तळोजा : युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी पनवेल, कळंबोली, परिसरातील उमेदवारांकडून नवनवीन शक्कल लढवण्यात येत आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी कार्यालये थाटून मतदारांना मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या महापालिकेत नगरसेवक पद भूषविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत आणि निवडणूक जाहीर होताच मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्याकडून विविध क्लृप्त्या लढवण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यातील पहिल्या महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत बाजी मारण्यासाठी इच्छुकांसह कार्यकर्त्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.